Google Pixel 8 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Google Pixel 8 Launch : पिक्सेल 8 अन् बरंच काही.. 'मेड बाय गुगल' इव्हेंटमध्ये काय-काय होणार लाँच?

Made By Google 2023 : गुगलचा बहुप्रतिक्षित इव्हेंट आज संध्याकाळी पार पडणार आहे.

Sudesh

गुगलच्या पिक्सेल सीरिजमधील नवीन स्मार्टफोन आज लाँच होणार आहे. 'मेड बाय गुगल' या इव्हेंटमध्ये गुगलचे नवीन पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो हे स्मार्टफोन लाँच केले जातील. यासोबतच, पिक्सेल वॉच 2 आणि नेक्स्ट जनरेशन पिक्सेल बड्स प्रो या गोष्टीही लाँच होतील.

भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज (4 ऑक्टोबर) सायंकाळी 7:30 वाजता हा इव्हेंट पार पडेल. गुगलच्या यूट्यूब चॅनलवरून हा इव्हेंट लाईव्ह पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपलने आपली नवीन आयफोन 15 सीरीज लाँच केली होती. गुगलची पिक्सेल 8 सीरीज ही याला टक्कर देणार असल्याचं म्हटलं जातंय.

काय असू शकतील फीचर्स?

टिप्स आणि लीक्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro या दोन्ही फोनमध्ये कंपनी नवी Tensor G3 चिपसेट देऊ शकते. बेस व्हेरियंटमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप, FHD डिस्प्ले आणि एआय फीचर्स मिळू शकतात. तर, प्रो मॉडेलमध्ये 50MP+48MP+48MP असा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये टेलिफोटो लेन्स असेल आणि टेम्परेचर सेन्सर देखील देण्यात येईल असं सांगण्यात येतंय.

पिक्सेल वॉच 2

मीडिया रिपोर्टनुसार, नव्या Pixel Watch 2 मध्ये 1.2 इंच मोठा OLED डिस्प्ले मिळेल. तसंच यामध्ये 2GB रॅम आणि 16 GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. यामध्ये फिटनेस ट्रॅकर्स, स्ट्रेस मॅनेजमेंट सिस्टीम, मल्टी पाथ हार्ट रेट सेन्सर, पेस ट्रेनिंग, 7 वेगवेगळे वर्कआउट मोड, इमर्जन्सी शेअरिंग आणि अनेक नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

पिक्सेल बड्स प्रो

गुगल 'पिक्सेल बड्स प्रो'च्या नवीन मॉडेलबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, कंपनी नवीन बड्सना वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये लाँच करू शकते, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT