iPhone 15  
विज्ञान-तंत्र

'मेड इन इंडिया' आयफोन 15 बाबत चीनमध्ये अफवा; फेकन्यूज अन् भारताविरोधात टोमण्यांचा पाऊस

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- Apple कडून iPhone 15 नुकताच मार्केटमध्ये आणण्यात आला आहे. यावरुन चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गदारोळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात बनवलेला आयफोन १५ चीनमध्ये विकला जाणार असल्याची अफवा लोकांमध्ये पसरली आहे. यावरुन चीनच्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भारताबाबतच्या पूर्वगृहदुषित प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

सोशल मीडियावर असा दावा करण्यात आलाय की, चीनमध्ये तयार झालेले आयफोन १५ युरोप आणि अमेरिकेत विकले जाणार आहेत.तर, भारतात बनवण्यात आलेले आयफोन १५ चीनच्या मार्केटमध्ये विकले जाणार आहेत. या अफवेमुळे चीनच्या नेटकऱ्यांनी भारतीय लोकांबाबत वांशिक द्वेषाच्या आणि पूर्वगृहदुषित प्रतिक्रिया दिली आहेत. (Made in India iPhone 15 rumours)

चिनी नेटकऱ्यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक चिनी नेटकरी म्हणाला की, 'नवीन आयफोन मिळाला आणि त्याच्यावरचे कव्हर काढल्यावर तुम्हाला आमटीचा (curry) वास येईल. काळजी करु नका. ते एकदम स्वच्छ आणि आरोग्यदायी आहे.'

आएखी एका चिनी नेटकऱ्याने म्हटलं की, 'भारतीय कामगार एका हाताने आमटी भात खात आहेत आणि दुसऱ्या हाताने मोबाईल हाताळत आहेत. तरी भारतात बनवलेले आयफोन १५ निर्जंतूक आहेत असं म्हटलं जातं.' चिनी लोकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरुन त्यांचा भारताबाबतचा दृष्टीकोन दिसून येत आहेत.

भारतीय लोक हे खूप अस्वछ राहतात. त्यांच्या वस्तूंना आमटी-भाताचा वास येतो. त्यामुळे त्यांच्या आयफोन १५ ला देखील असाच वास येईल, असं चिनी नेटकऱ्यांना सूचवायचं आहे. अशी अफवा पसवण्यात आलीये की, तुम्ही चीनमध्ये आयफोन १५ खरेदी केला तर तो मेड इन इंडिया असेल.

भारताचा Apple च्या निर्मितीमध्ये वाढता प्रभाव यामुळे चिनी लोक संतापल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक खोट्या बातम्या जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. भारतात बनवलेले तब्बल ५० टक्के मोबाईल परत करण्यात आल्याची अशीच एक अफवा चीनच्या नेटकऱ्यांकडून पसरवण्यात आलीये. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT