Madhya Pradesh Dinosaur Eggs eSakal
विज्ञान-तंत्र

Madhya Pradesh Dinosaur Eggs : कुलदैवत म्हणून करत होते पूजा, अन् ते निघालं डायनासोरचं अंडं! मध्य प्रदेशातील प्रकार

केवळ मांडलोई कुटुंबच नाही, तर गावातील इतर घरांमध्ये देखील अशाच प्रकारच्या गोलाकार वस्तूंची पूजा केली जात होती.

Sudesh

Dinosaur Eggs found in Madhya Pradesh : मानला तर देव नाहीतर दगड अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मध्य प्रदेशातील लोकांना आला. या गावातील लोक गेली कित्येक वर्षे कुलदैवत म्हणून ज्या गोष्टीची पूजा करत होते, ती गोष्ट म्हणजे चक्क डायनासोरचं अंडं असल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेने सर्वच जण चकित झाले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, एमपीमधील पांडलया गावातील वेस्ता मांडलोई हे या गोलाकार वस्तूची पूजा करत. 'काकर भैरव' देवतेचं रुप समजून या वस्तूची पूजा त्यांच्या कुटुंबामध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुरू होती. आपली कुलदेवता शेतीचं आणि पाळीव प्राण्यांचं रक्षण करते असा त्यांचा विश्वास आहे.

असे तयार झाले काकर भैरव

काकर या शब्दाचा अर्थ शेती किंवा रान असा होतो. तर भैरव हे भगवान महादेवाचे दुसरे नाव आहे. केवळ मांडलोई कुटुंबच नाही, तर गावातील इतर घरांमध्ये देखील अशाच प्रकारच्या गोलाकार वस्तूंची पूजा केली जात होती. हे गोलाकार दगड त्यांना आजूबाजूच्या जमीनीमध्ये खोदकाम करताना मिळाले होते. मात्र, आता हे दगड नसून चक्क डायनासोरची अंडी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

असा झाला खुलासा

लखनऊच्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉनटीमधील वैज्ञानिक काही दिवसांपूर्वी धार भागात पोहोचले होते. मध्य प्रदेशातील या भागात डायनासोरचे अवशेष मिळाले होते. यानंतर त्यांना समजलं की एका विशिष्ट गोलाकार वस्तूची लोक पूजाही करत आहेत. त्या वस्तूची चाचणी केल्यानंतर वैज्ञानिकांना धक्का बसला. हे सर्व डायनासोरची अंडी असल्याचं या चाचणीमध्ये स्पष्ट झालं.

नर्मदेच्या खोऱ्यात डायनासोरचं अस्तित्व होतं याचे कित्येक पुरावे याआधीही मिळाले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात देखील धार भागात डायनासोरची 256 अंडी मिळाली होती. ही डायनासोरची अंडी असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरीही आपण यांची पूजा करणं थांबवणार नसल्याचं पांडलया गावातील नागरिकांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT