mahindra announces new electric vehicle released teaser of upcoming electric suv check details  
विज्ञान-तंत्र

येतेय महिंद्राची इलेक्ट्रिक कार; आनंद महिंद्रांनी रिलीज केला टीझर

सकाळ डिजिटल टीम

Mahindra Electric Car : महिंद्रा (Mahindra) ग्रुप लवकरत इलेक्ट्रिक फोर व्हीलर (Electric Vehicle) सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी 11 फेब्रुवारी रोजी या मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक टीझर पोस्ट केला आहे, कंपनी येत्या काही महिन्यांत तीन नवीन इलेक्ट्रिक वाहने आणण्याच्या तयारीत आहे. आनंद महिंद्रा यांनी स्वतः ट्विट करून त्याची पहिली झलक दाखवली.

आनंद महिंद्रा यांनी शेयर केलेल्या व्हिडिओ टिझरमध्ये नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीची झलक पाहायला मिळत आहे. कंपनी जुलै 2022 पर्यंत भारतात इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. महिंद्रा कंपनीचे हे पहिले इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) असेल. महिंद्रा बॉर्न इलेक्ट्रिक बजेट सेगमेंट आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही फॉर्म फॅक्टरमध्ये असेल.

ब्रिटनच्या ऑक्सफर्डशायर मध्ये डिझाइन

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑक्सफोर्डशायर, यूकेमध्ये डिझाइन केली गेली आहे. त्याचा टीझर पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, "आम्ही संपूर्ण नवीन जगाची कल्पना करत आहोत आणि या नवीन जगात जन्म घेणारी पहिली मुले अस्वस्थ होत आहेत..."

महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक SUV टाटा मोटर्स (Tata Motors) च्या EV Nexon आणि मारुती सुझुकी सारख्या भारतीय ब्रँड्स तसेच Hyundai आणि MG Motor सारख्या बड्या कंपन्यांना टक्कर देईल, ज्यांनी आधीच इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत लॉंच केली आहेत.

महिंद्राची इलेक्ट्रिक XUV300

या नवीन इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त (EVs), महिंद्रा आपली SUV XUV300 देखील इलेक्ट्रिकमध्ये बदलत आहे. काही रिपोर्ट्सनुसार Mahindra XUV300 इलेक्ट्रिक या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होईल. दरम्यान इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विकासासाठी महिंद्राने हिरो इलेक्ट्रिकशी भागीदारी देखील केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT