Mahindra Scorpio 2022
Mahindra Scorpio 2022 Sakal
विज्ञान-तंत्र

Mahindra Scorpio: स्कॉर्पिओ लॉन्चची तारीख आली जवळ; फोटो अन् फिचर्स लीक

सकाळ डिजिटल टीम

नवीन महिद्रा स्कॉर्पिओची (Mahindra Scorpio) भारतातील एसयूव्हीप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहोत. दोन दशकांपासून भारतीय बाजारपेठेत असलेली ही एसयूव्ही (SUV) शहरांबरोबरच खेड्यांमध्येही चांगलीच पसंतीस उतरली आहे. ताज्या अहवालानुसार, नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही 20 व्या वर्धापन दिनानिमित्त जूनमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीने कारचे टीव्ही कमर्शियल आणि मार्केटिंग देखील सुरू केले आहे.

असा असेल एक्सटेरिअर लूक-

समोर आलेल्या फोटोवरून असे दिसते की, दुसऱ्या पिढीच्या स्कॉर्पिओला पूर्णपणे नवीन डिझाइन दिले जाईल. समोर एक नवीन 6-स्लॅट ग्रिल असेल, जी XUV700 पेक्षा लहान आहे. क्रोम ट्रीटमेंटसह याला पूर्वीपेक्षा अधिक उत्कृष्ट दिसणारे हेडलाइट्स मिळतात. एसयूव्हीच्या टॉप व्हेरियंटमध्ये एलईडी हेडलॅम्प असतील. याशिवाय मोठे फ्रंट बंपर, फॉग्लॅम्प्स आणि डीआरएल उपलब्ध असतील. ते पूर्वीपेक्षा मोठे, लांब आणि अधिक मस्क्युलर असेल.

इंजिन आणि शक्ती-

2022 स्कॉर्पिओमध्ये थारसारखे 2.2-लीटर डिझेल आणि 2.0-लीटर पेट्रोल इंजिन्स असतील. परंतु स्कॉर्पिओमधील इंजिन अधिक पॉवर आणि टॉर्कसह येईल. 2022 स्कॉर्पिओला थार प्रमाणे नवीन लॅडर फ्रेम चेसिस देखील मिळेल. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह टॉप व्हेरियंटमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्यायही मिळेल. पॉवर फक्त खालच्या व्हेरियंटमध्ये मागील चाकांवर उपलब्ध असेल. 2022 स्कॉर्पिओच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, परंतु तिची किंमत 12 ते 20 लाखांपर्यंत असू शकते.महिंद्रा स्कॉर्पिओ लॉन्चची तारीख जवळ आली आहे, चित्रांमध्ये मोठे तपशील लीक झाले आहेत

प्रगत वैशिष्ट्यांसह केबिन-

XUV700 प्रमाणे, Scorpio च्या टॉप व्हेरियंटमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल, तर मोठी इन्फोटेनमेंट टचस्क्रीन डॅशबोर्डच्या मध्यभागी असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी स्वतंत्र एसी व्हेंट्स आणि ब्लोअर कंट्रोल्स असतील. रिपोर्ट्सनुसार, 2022 स्कॉर्पिओच्या केबिनमध्ये प्रत्येक तपशीलावर काम करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT