Mahindra Thar Sakal
विज्ञान-तंत्र

Mahindra SUV: ठरलं! 'या' खास तारखेला येतेय Mahindra Thar चे नवे मॉडेल, किंमत फक्त...

ऑटोमोबाइल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने Mahindra Thar 5 Door च्या लाँचिंगबाबत नवीन अपडेट दिले आहे. कंपनी महिंद्रा थार ५ डोर व्हेरिएंट २६ जानेवारीला सादर करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mahindra Thar 5 Door Launch Soon: ऑटोमोबाइल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने Mahindra Thar 5 Door च्या लाँचिंगबाबत नवीन अपडेट दिले आहे. कंपनी महिंद्रा थार ५ डोर व्हेरिएंट २६ जानेवारीला सादर करणार आहे. मात्र, कंपनीने अद्याप गाडीच्या किंमत आणि लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Mahindra Thar 5 Door मध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन

Mahindra Thar 5 Door मध्ये देखील जुन्या मॉडेलमध्ये मिळणारेच इंजिन दिले जाईल. यात २.२ लीटर एमहॉक डिझेल इंजिन आणि दुसरे २.० लीटर एमस्टायलियॉन पेट्रोल इंजिन दिले जाई. हे दोन्ही इंजिन ६ स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतात. याशिवाय, ५ डोर व्हेरिएंटमध्ये 4X4 आणि 4X2 असे दोन पर्याय देखील मिळेल.

रिपोर्टनुसार, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत याची लांबी १२ ते १८ टक्के जास्त असेल. गाडीची लांब ३९८५ एमएम असू शकते. तसेच, कंपनी या नवीन व्हेरिएंटला ६ आणि ७ सीट पर्यायासह सादर करू शकते.

Mahindra Thar 5 Door मध्ये सध्याच्या मॉडेलमध्ये मिळणारेच फीचर्स दिले जातील. कारमध्ये अ‍ॅड्राइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येणारी ९ इंच टचस्क्रीन इंपोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, एलईडी हेडलाइट, डीआरएलए, इलेक्ट्रिक सनरूफ, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, फ्रंट सीट्ससाठी ड्यूल एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर्स, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, रियरला १२ वोल्ट चार्जिंग पॉइंट सारखे फीचर्स मिळतील.

महिंद्रा थारच्या या नवीन मॉडेलची किंमत जवळपास १५ लाख रुपयांपर्यंत असू शकते. म्हणजेच सध्याच्या मॉडेलपेक्षा ही किंमत १ ते २ लाख रुपये जास्त असेल. लाँचिंगनंतर ही एसयूव्ही Force Gurkha आणि लवकरच लाँच होणाऱ्या Maruti Jimny 5Door ला टक्कर देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT