Mahindra Thar Electric Concept eSakal
विज्ञान-तंत्र

Thar Electric : आता येणार इलेक्ट्रिक थार! 15 ऑगस्टला महिंद्रा सादर करणार डिझाईन; 'हे' असतील फीचर्स

Mahindra Thar Electric : या कारमध्ये क्रॅब-वॉक फीचर्स दिलं जाऊ शकतं.

Sudesh

Thar EV : महिंद्रा कंपनीची 'थार' गाडी ही भरपूर लोकप्रिय आहे. अगदी डॅशिंग लुक असणाऱ्या या गाडीचं आता इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका इव्हेंटमध्ये 15 ऑगस्ट रोजी महिंद्रा कंपनी या कारचं डिझाईन सादर करेल.

कशी असणार ई-थार?

थार गाडी ही ऑफरोडिंग वैशिष्ट्यासाठी ओळखली जाते. इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये त्याचं हे वैशिष्ट्य कायम ठेवण्यात येणार आहे. सोबतच यामध्ये क्वाड-मोटर सिस्टिम देण्याची शक्यता आहे. क्रॅब स्टिअर किंवा क्रॅब-वॉक सारखे फीचर्स देखील यामध्ये असतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

काय आहे क्रॅब-वॉक?

क्रॅब-वॉक फीचर असणाऱ्या गाड्यांची चारही चाकं जागेलाच 45 अंश कोनापर्यंत वळू शकतात. या फीचरमुळे अशा गाड्या उभ्या जागी 360 अंश कोनात वळू शकतात. तसंच, अशा गाड्या आडव्या देखील चालू शकतात. यामुळे अतिशय छोट्या जागी पार्किंग करणं किंवा गाडी वळवणं सोपं होतं. हमर ईव्ही आणि G-क्लास प्रोटोटाईप कार्समध्ये हे फीचर देण्यात आलं आहे. (Electric Vehicles)

कधी होणार लाँच?

या थारचं डिझाईन कसं असेल, किंमत किती असेल, किंवा ती कधी लाँच होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 15 ऑगस्ट रोजी यातील फीचर्ससोबत ही माहिती देखील दिली जाऊ शकते. (Mahindra Thar EV)

सध्या थार गाडी ही विविध प्रकारच्या इंजिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. 4x4 व्हेरियंटमध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, आणि 2.2 लीटर डिझेल इंजिन या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर, 4x2 व्हेरियंट हे 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT