Facebook eSakal
विज्ञान-तंत्र

Facebook : तरुणाचं अकाउंट ब्लॉक करणं फेसबुकच्या अंगलट! कोर्टाने केली कारवाई, द्यावी लागणार ४१ लाखांची भरपाई

एका तरुणाचं अकाउंट फेसबुकने ब्लॉक केलं होतं. यानंतर या तरुणाने फेसबुकवरच खटला दाखल केला.

Sudesh

तुम्ही फेसबुक वापरत असाल, तर तुम्हाला माहिती असेल की तिथे काहीही पोस्ट करताना ठराविक गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. फेसबुकच्या काही नियमांनुसार पोस्ट केल्या नाहीत, तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं. अशाच प्रकारची कारवाई फेसबुकने एका तरुणावर केली होती. मात्र, ही कारवाई फेसबुकच्याच अंगलट आली आहे.

एका तरुणाचं अकाउंट फेसबुकने ब्लॉक केलं होतं. यानंतर या तरुणाने फेसबुकवरच खटला दाखल केला. यानंतर न्यायालयाने त्याला ५० हजार डॉलर्स, म्हणजेच सुमारे ४१ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश फेसबुकला दिले आहेत.

विनाकारण केलं ब्लॉक

या तरुणाने असा दावा केला होता, की फेसबुकने कोणतंही कारण न देता आपलं अकाउंट बंद केलं आहे. काही पॉलिटिकल कमेंट्स केल्याप्रकरणी फेसबुकने आधी त्याला व्हायोलेशन नोटीस दिली होती. मात्र, त्यानंतर कंपनीने त्याचं अकाउंट थेट बंद केलं.

आपलं अकाउंट सुरू करण्यासाठी या तरुणाने फेसबुकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर या तरुणाने थेट न्यायालयात धाव घेत मदत मागितली.

फेसबुकच्या गाईडलाईन्स

फेसबुकवरुन कोणतीही चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. फेसबुक अकाउंटच्या सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही या गाईडलाईन्स पाहू शकता. हेट स्पीज, देशविरोधी कंटेंट अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही फेसबुकवर पोस्ट करू शकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी पोस्ट केल्यास फेसबुक आधी तुम्हाला वॉर्निंग देतं. मात्र, तुम्ही वारंवार हेच करत असाल, तर तुमचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT