Google Home Introduces Versatile 'Favorites' Widget in Latest Android Update esakal
विज्ञान-तंत्र

Google Home : गुगल होमचं 'हे' नवीन फिचर बघून व्हाल शॉक; घरातल्या स्मार्ट गॅजेट्सवर 'असं' ठेवा नियंत्रण

Google Home 'Favorites' Widge : स्मार्ट लॉक किंवा गॅरेज डोअरसारख्या गॅझेट्ससाठी अतिरिक्त सुरक्षा

सकाळ डिजिटल टीम

Google Home : आजकालच्या घरांमध्ये स्मार्ट होम गॅझेट्स मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. पण या वेगवेगळ्या गॅझेट्सचा सुलभ आणि जलद नियंत्रण करण्यासाठी अनेकांना अडचण येते. यावर तोडगाड म्हणून गूगलने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी एक सुंदर फीचर आणलं आहे "फेव्हरेट्स" विजेट!

हे नवीन विजेट तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर राहणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला अॅप उघडण्याची गरज न पडता तुमच्या आवडत्या स्मार्ट होम गॅझेट्सवर सहज नियंत्रण ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे, हे विजेट दोन प्रकारे वापरता येतं. पहिली सोपस्की पद्धत म्हणजे तुमच्या गूगल होम अॅपमधील फेव्हरेट्स यादी थेट तुमच्या होम स्क्रीनवर आणणे. दुसरी पद्धत म्हणजे, तुम्हाला आवडतील त्या गॅझेट्स निवडून त्यांचं एक वेगळं विजेट तयार करणे.

या विजेटवर तुम्ही तुमच्या आवडीनं फेरफार करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या आवडत्या गॅझेट्सची रचना बदलू शकता किंवा विजेटची आकार बदलू शकता. अगदी तुमच्या घरात विविध ठिकाणी असलेल्या स्मार्ट गॅझेट्सवरही नियंत्रण ठेवता येणार आहे. आत्ताच्या टप्प्यात दिवे, प्लग्स, आणि ब्लाइंड्ससारख्या गॅझेट्ससाठी हे विजेट थेट चालू/बंद करण्याचं काम करेल. इतकंच नाही तर कॅमेरा, वायफाय, थर्मोस्टॅटसारख्या गॅझेट्ससाठी हे विजेट संबंधित नियंत्रण पृष्ठ थेट अॅपमध्ये उघडेल.

हे विजेट सध्या 30 मिनिटांनी रिफ्रेश होत असून भविष्यात ऑटोमेशनसाठीही सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे.

हे नवीन तंत्रज्ञान वापरात असताना सुरक्षेची बाबही महत्वाची आहे. विशेषत: स्मार्ट लॉक किंवा गॅरेज डोरसारख्या गॅझेट्ससाठी अतिरिक्त प्रमाणिकरणाची आवश्यकता असेल. त्यामुळे तुमच्या घराची सुरक्षा कायम राखली जाणार आहे.

हे विजेट तुमची होम स्क्रीन सुशोभित करेलच पण सोबतच तुमच्या स्मार्ट होमला सुलभ आणि जलद नियंत्रण देईल, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT