Manual vs Automatic esakal
विज्ञान-तंत्र

Manual vs Automatic Car : कोणती कार खरेदी केल्यास होईल फायदा?; तज्ज्ञ म्हणतात...

Manual vs Automatic Car: जेव्हा आपल्या दारातही गाडी असावी हे कित्येक वर्ष पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाता.

Pooja Karande-Kadam

Manual vs Automatic Car: जेव्हा आपल्या दारातही गाडी असावी हे कित्येक वर्ष पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाता. तेव्हा गाडीचा रंग, मॉडेल कोणतं घ्यायचं हे तर आधी ठरलेलं असतं. त्यामूळे आपण शोरूमला जातो आणि हवी ती गाडी निवडतो. तेव्हा त्या गाडीच इंजिन कोणतं आहे, किती ऍव्हरेज आहे? हे पाहीलं की तूमचा गोंधळ उडतो.  

शोरूममध्ये गेल्यावर अधिकारी एकाच मॉडेलमध्ये अनेक गिअरबॉक्सची लिस्टच तूम्हाला सांगतो. मॅन्युअल व्यतिरिक्त, कारला AMT, IMT आणि DCT चे पर्याय देखील मिळतील. त्यानंतर त्यांना रेटींग दिले जाते. त्यामूळे नक्की कोणती गाडी निवडायची असा प्रश्न तूम्हाला पडतो.

तुम्हीही फेस्टीव्ह सिझनला कार घेण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी कोणता गिअरबॉक्स असलेली गाडी घ्यावी परफेक्ट आहे हे कसे ओळखावे?आज याची माहिती घेऊयात.

भारतीय वाहन बाजारात आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या गाड्यांची संख्या वाढू लागली आहे. अनेक कंपन्या नवीन कार लाँच करताना त्या कारचे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही व्हेरिएंट्स लाँच करू लागल्या आहेत. बरेच ग्राहक मॅन्युअल कार सोडून ऑटोमॅटिक कार खरेदी करणं पसंत करू लागले आहेत.

अजूनही बाजारात मॅन्युअल कार्सचीच जास्त विक्री होत आहे. तरी ऑटोमॅटिक कार्सची भारतात विक्री वाढली आहे. कार मॅन्युअल असो अथवा ऑटोमॅटिक या दोन्ही कार्सचे फायदे आणि तोटे आहेत.

मॅन्युअल (MT)

  • हा एक मल्टी-स्पीड गिअरबॉक्स आहे. ज्यामध्ये कोणत्या स्पीडनुसार गीअर कधी शिफ्ट करायचा हे ड्रायव्हर स्वतः ठरवतो.

  • म्हणजेच गीअर बदलण्यासाठी ड्रायव्हरला त्याचे इनपुट तसेच गीअर लीव्हर, क्लच द्यावा लागतो.  ब्रेक आणि एक्सलेटर हे सर्व चालकाला चालवावे लागतात.

ऍटोमॅटीक (AT किंवा टॉर्क कन्व्हर्टर)

  • वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यांवर किंवा शहरातल्या अरुंद रस्त्यांवरदेखील तुम्ही ऑटोमॅटिक कार सहज चालवू शकता. या गिअरबॉक्सला मॅन्युअल इनपुटची आवश्यकता नाही. यामध्ये सर्व काम सेन्सर्स करतात. स्पीड आणि RPM नुसार गिअर बदलायचा की नाही हे सेन्सर्स स्वतः ठरवतात.

  • यामध्ये एक गियर लीव्हर असतो. पण तुम्ही त्याचा वापर गियर बदलण्यासाठी नाही तर ड्राइव्ह, रिव्हर्स, न्यूट्रल आणि पार्किंग मोडमध्ये जाण्यासाठी करू शकता.

  • या गिअरबॉक्समध्ये क्लच पेडल नसते. यात टॉर्क कन्व्हर्टर नावाचे उपकरण आहे. हे उपकरण क्लचऐवजी गीअर्स बदलण्याचे सर्व काम करते. त्यामुळे ते खूप वेगाने काम करते आणि सर्वात विश्वासार्ह देखील मानले जाते.

गाडीसाठी कोणता गिअर बॉक्स ठरेल फायद्याचा

 ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT)

  • हा मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. परंतु यामध्ये क्लच ऑपरेशन एका विशिष्ट AMT युनिटच्या मदतीने केले जाते.

  • स्वयंचलित मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये क्लच पेडल नसते. परंतु इंजिनच्या आत एक क्लच असतो. ज्याचे नियंत्रण ऑटोमॅटिक असते. म्हणजे जेव्हा गीअर बदलेल तेव्हा क्लच AMT युनिटच्या मदतीने कार्य करेल.

  • हे एक स्वस्त आणि तितकीच प्रभावी ऑटोमॅटीक तंत्रज्ञान आहे. परंतु इंजिनमध्ये असलेल्या क्लचमूळे AT पेक्षा थोडे स्लो काम करते.

     

डुअल क्लच ट्रांसमिशन (DCT)

  • नावाप्रमाणेच यात दोन क्लचेस आहेत. पण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी करतात. एक क्लच ऑड नंबरचे गीअर्सची म्हणजे 1,3,5 लक्षात ठेवतो. तर, दुसरा ईवन नंबरचे गीअर्सची म्हणजे 2,4,6 ची काळजी घेतो.

  • यामध्ये दोन क्लच ऑपरेशन आहेत. त्यामुळेच ते खूप वेगाने काम करते. तज्ञांच्या मते, ऑटोमॅटिक्सच्या जगात हा सर्वात वेगवान गिअरबॉक्स मानला जातो.

कंटीन्यूअसली वेरिएबल ट्रांसमिशन (CVT

  • तज्ञांच्या मते, टेक्निकली यामध्ये कोणतेही गियर नसतात. मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये जेथे गीअर रेशो असतात. तसे रेशो CVT मध्ये नसतात.

  • CVT मध्ये क्रम सेट केलेला असतो. यात दोन पुली असतात जे बेल्ट किंवा साखळीने एकमेकांना जोडलेले असतात. हे टप्प्याटप्प्याने कार्य करते आणि त्यानुसार वेग वाढवते. सर्वात जास्त जपानी लोक CVT वापरतात.

मॅन्युअल गिअरला परंपरेची जोड तर ऍटोमॅटिकला अडव्हान्स टेक्नॉलॉजी

 बजेट किती आहे यावर ठरवा

15 लाखांपेक्षा जास्त बजेट असेल तरच ऑटोमॅटिक कार घ्यावी असा काहींचा समज आहे. पण, तज्ञांच्या मते, असं काही नाहीय. हे आपले स्वतःचे प्राधान्य आहे. तुम्ही मुंबई किंवा दिल्ली सारख्या मोठ्या शहरात राहत असाल, जिथे तुम्हाला दररोज ट्रॅफिक जामला सामोरे जावे लागते, तर त्यासाठी स्वयंचलित वर स्विच करण्यात अर्थ आहे सुविधा आता यामध्ये कोणती ऑटोमॅटिक कार त्यांच्या बजेटशी जुळते हे ते ठरवू शकतात.

जर तुम्ही गाडी वापरण्याचे प्रमाण कमी असेल. तर, ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजीमध्ये पैसे गुंतवण्याची गरज नाही. कारण जेवढे सेन्सर जास्त तेवढा देखभाल खर्च जास्त. त्यामूळे मॅन्युअल गाडीचा विचार करा.

ट्राफिक जाममध्ये अडकल्यानंतर ही गाडी ठरते आरामदायक

तूमच्यासाठी कोणता गिअर बॉक्स चांगला

मॅन्युअल विश्वासार्ह

मॅन्युअल ट्रान्समिशनवाल्या कार अगदी सुरुवातीपासून भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही सहज कार ओव्हरटेक करू शकता आणि या कार मायलेज देखील चांगलं देतात. उत्तम ड्रायव्हिंग स्किल्स तुम्हाला चांगलं मायलेज मिळवून देतील.

तज्ञांच्या मते, तुमचं ड्रायव्हिंग चांगलं असेल आणि तुम्ही सरासरी वेगाने कार चालवत असाल तर तुमची मॅन्युअल कार ऑटोमॅटिक कारपेक्षा चांगलं मायलेज देऊ शकते. मॅन्युअल कारची किंमत ऑटोमॅटिक कारपेक्षा कमी असते.

ऑटोमॅटिक मॅन्युअल कारपेक्षा सोपं

भारतात अलिकडच्या काळात ऑटोमॅटिक कार्स खूप लोकप्रिय झाल्या आहेत. ऑटोमॅटिक कार चालवणं मॅन्युअल कारपेक्षा सोपं असतं. ही कार तुम्ही चालवायला शिकायला सुरुवात केली तर खूप कमी दिवसात तुम्ही ऑटोमॅटिक कार शिकाल. महिला आणि वृद्धांसाठी या कार उत्तम असतात. कारण या कार शिकायला आणि चालवायला सोप्या असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT