MapmyIndia CEO Questions Credibility of Ola Maps, Labels it a Gimmick esakal
विज्ञान-तंत्र

OLA - MapMyIndia Controversy : मॅपमायइंडिया आणि ओलामध्ये जुंपली; 'फसवेगिरी'चा गंभीर आरोप; काय आहे प्रकरण?

MapMyIndia Legal Action against OLA Gimmick Controversy : भारताच्या नकाशा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठा वाद वाढत चालला आहे.मॅपमायइंडिया आणि ओलामध्ये हा वाद आहे.

Saisimran Ghashi

OLA Maps : भारताच्या नकाशा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठा वाद वाढत चालला आहे. मॅपमायइंडियाचे सीईओ रोहन वर्मा यांनी नुकतीच ओलाच्या नवीन नकाशा सेवेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ओलाच्या या सेवेला "फसवेगिरी" (Gimmick) म्हटले असून त्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर ओलाने मात्र जोरदार प्रतिवाद केला असून मॅपमायइंडियाचा हा आरोप फेटाळला असल्याचे म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, वर्मा यांनी ओला इलेक्ट्रिकला पाठवलेल्या कायदेशीर नोटीशीचा दाखला देत ओलाच्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. ओलाच्या मॅप्स (Ola Maps) ला जियोस्पोक प्रा.लि. या स्टार्टअपने विकसित केले आहे, असा दावा आहे. ही कंपनी ओलाची मालक कंपनी एएनआय टेक्नोलॉजीजने विकत घेतली आहे. मात्र वर्मा यांनी भारतासारख्या मोठ्या देशासाठी नकाशा तयार करण्यासाठी मोठी गुंतवणूक आणि तज्ज्ञता लागते, जी जियोस्पोककडे असण्याची शक्यता नाही, असे म्हटले आहे.

"नकाशे तयार करणे हा एक गांभीर्यपूर्ण आणि महत्वाची बाब असणारा व्यवसाय आहे. त्यासाठी जास्त वेळ, पैसा आणि तज्ज्ञता लागते. जगातील अनेक प्रयत्नांनंतरही, काहीच यशस्वी कंपन्या आहेत. ज्यांनी योग्य ट्रॅक रेकॉर्ड आणि प्रामाणिकता नसताना कोणीतरी अचानक येऊन नकाशे तयार केल्याचा दावा करू शकत नाही, विशेषत: ज्यांनी इतक्या वर्षांपासून दुसऱ्या कंपनीचा नकाशा डेटा आणि एपीआय (API) आणि एसडीके (SDK) वापरले आहेत अशा कंपनीसाठी तर नाहीच," असे वर्मा म्हणाले.

23 जुलै रोजी मॅपमायइंडियाने ओलावर कायदेशीर कारवाई केली होती. त्यांनी ओलाने मॅपमायइंडियाच्या नकाशा वापरण्यासाठी (API) आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) वापरण्यासाठी केलेल्या 2021च्या करार उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. वर्मा यांनी ओलाची मालक कंपनी एएनआय टेक्नोलॉजीज ही 2015 पासून मॅपमायइंडियाशी करारात होती, हे नमूद केले.

ओलाने वर्मा यांच्या आरोपांवर त्वरित उत्तर दिले. ओलाच्या प्रवक्त्यांनी मॅपमायइंडियाच्या आरोपांना फेटाळले आहे. ओला मॅपमायइंडियाच्या निराधार आणि हेतूने केलेल्या आरोपांना पूर्णपणे नाकारतो. हे स्पर्धकांवर टीका करून बाजारात आपले स्थान राखण्यासाठी केलेले प्रयत्न आहे,असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Kashish Fulwaria: भाजपची सर्वात तरुण नगरसेविका कशिश फुलवारीया कोण? वयाच्या २२व्या वर्षी मुंबई महापालिकेत विजय

CM Devendra Fadnavis: पुण्याची जनताच दादा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या नेत्यांना स्वीकारले!

Republic Day security : दिल्लीसह अनेक शहरांत प्रजासत्ताक दिनाआधी बांगलादेशी दहशतवादी संघटनाचा घातपाताचा कट, अलर्ट जारी

Chardham Yatra: नव्या वर्षात बदरी-केदारसह चारी धामांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी; रीलवर प्रशासनाची कडक 'नजर'

Latest Marathi Live Update: मतदारांना धमकी दिल्याचा आरोप प्रकरणात सिल्लोड न्यायालयाची अब्दुल सत्तारांना नोटीस

SCROLL FOR NEXT