PURE EV ETrance
PURE EV ETrance 
विज्ञान-तंत्र

6 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर घरी घेऊन जा प्यूर इव्ही ईट्रान्स (PURE EV ETrance) इलेक्ट्रिक वाहन; इतका ईएमआय भरावा लागेल

सुस्मिता वडतिले

पुणे :भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर झाला आहे. अशा परिस्थितीत, तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आपणही अडचणीत असाल तर आपण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकता. इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने खरेदी केल्यानंतर, आपल्याला पुन्हा पुन्हा पेट्रोल भरण्याच्या त्रासातून मुक्तता मिळेल.

जर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचे असेल तर तुम्ही PURE EV ETrance Plus खरेदी करू शकता. हे मोपेड आहे परंतु त्याची रेंज 60 किमी आहे. 6 हजार रुपयांच्या डाउनपेमेंटनंतर तुम्ही हे मोपेड घरी घेऊन जाऊ शकता. त्याची एकूण किंमत 56,999 रुपये (ऑन रोड प्राइस, दिल्ली) आहे.

6 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला तीन वर्षांसाठी एकूण 56,999 रुपये कर्ज घ्यावे लागेल. त्यावर 9.7 टक्के व्याज दर लागू होईल. या तीन वर्षांत तुम्हाला 14,845 रुपयांच्या व्याजसह एकूण 65,844 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर 36 महिन्यांसाठी तुम्हाला 1,829 रुपये ईएमआय भरावा लागेल.

जर तुम्हाला ईएमआयवरील भार कमी हवा असेल तर तुम्ही 5 वर्षांसाठी या मोपेडला फायनान्स (वित्तपुरवठा) करू शकता. यावेळी तुम्हाला 24,721 रुपये व्याजसह एकूण 75,720 रुपये द्यावे लागतील. या कालावधीत, आपल्याला 60 महिन्यांसाठी दरमहा 1,262 रुपये ईएमआय भरावा लागेल.

या मोपेडच्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, त्यात 1 KWH रिमुवेबल बॅटरी आहे जी 3 ते 4 तासांदरम्यान पूर्णपणे चार्ज केली जाते. हे मोपेड 100 किलो भार सहन करू शकते. यासह एलईडी स्क्रीन एलईडी इंटिग्रेटर, ड्युअल सस्पेंशन, 60 एनएम मोटर पीक टॉर्क, स्टोरेज बॉक्ससह मिळते. यात वेगळ्या सेटसह तीन वेगवेगळ्या राइडिंग मोड आहेत. या मोपेडचा कमाल वेग 35 किमी / तासाचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mihir Kotecha: भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात जोरदार राडा; पैसे वाटल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून तोडफोड

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

MI vs LSG Live Score IPL 2024 : केएलच्या संथ फलंदाजीवर निकोलसचा आक्रमक उतारा; मुंबईसमोर ठेवलं 215 धावांचे आव्हान

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

SCROLL FOR NEXT