Mark Zuckerberg Net Worth eSakal
विज्ञान-तंत्र

Mark Zuckerberg : फेसबुकचा बर्थडे अन् झुकरबर्गला गिफ्ट! बिल गेट्सला मागे टाकून ठरला जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ती

Mark Zuckerberg Net Worth : फेसबुकची पॅरंट कंपनी असणाऱ्या मेटाने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानंतर मेटाच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली.

Sudesh

Mark Zuckerberg Surpasses Bill Gates : 2004 साली आजच्याच दिवशी फेसबुकची सुरुवात झाली होती. 20 वर्षांनंतर याच दिवशी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान झुकरबर्गला मिळाला आहे. (Facebook Birthday)

फेसबुकची पॅरंट कंपनी असणाऱ्या मेटाने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानंतर मेटाच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली. या तेजीमुळे मार्कला तब्बल 28 बिलियन डॉलर्सचा फायदा झाला. यामुळे झुकरबर्गची नेट वर्थ आता 165 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. (Mark Zuckerberg Net Worth)

बिल गेट्स यांची नेट वर्थ ही 124 बिलियन डॉलर्स (Bill Gates Net Worth) एवढी आहे. मार्कच्या संपत्तीत झालेल्या वाढीमुळे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. मार्क झुकरबर्गनंतर या यादीमध्ये बर्नार्ड अर्नाल्ट, इलॉन मस्क आणि जेफ बेझोस हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत.

संपत्तीत होणार आणखी वाढ

दरम्यान, मेटा कंपनी मार्च महिन्यात आपला पहिला डिव्हिडंड देणार आहे. यामध्ये कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना 174 मिलियन डॉलर्स कॅश मिळणार आहेत. जर मेटाने 50 टक्के क्वार्टरली डिव्हिडंड कायम ठेवला, तर मार्कला दरवर्षी तब्बल 690 मिलियन डॉलर्स मिळण्याची शक्यता आहे. CNBC ने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT