Maruti cars May 2023 Discount
Maruti cars May 2023 Discount esakal
विज्ञान-तंत्र

Maruti cars May 2023 Discount : मारुतीच्या या 8 गाड्यांवर मिळते आहे बंपर सूट, त्वरा करा

सकाळ डिजिटल टीम

Maruti cars May 2023 Discount : कार खरेदी करण्याआधी ग्राहकांना ऑफर आणि डिस्काउंट संबंधी जाणून घेणे गरजेचे आहे. कारण, डीलरशीप लेवलवर प्रत्येक महिन्यात काही ना काही कॅशबॅक आणि कॉर्पोरेट डिस्काउंट सोबत एक्सचेंज बोनस सारख्या ऑफर्स येत असतात.

या डिस्काउंट आणि ऑफर्स संबंधी ग्राहकांना माहिती असल्यास फायदा मिळू शकतो. जर तुम्हाला या दिवसात मारुती सुझुकीची स्विफ्ट, वेगनआर, डिझायर, सिलेरियो, ईको, एस प्रेसो आणि अल्टो कार खरेदी करायची असेल तर या महिन्यात या कारवर मिळणाऱ्या ऑफर संबंधी जाणून घ्या.

मारुती सुझुकी अल्टो के १०, अल्टो ८०० आणि एस प्रेसो वर किती सूट

मारुती सुझुकीच्या एन्ट्री लेवल हॅचबॅक अल्टो के १० खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या महिन्यात ४० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट सोबत १५ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयाचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.

तर अल्टो ८०० वर ग्राहकांना १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळेल. मारुती सुझुकी एस प्रेसोवर या महिन्यात ग्राहकांना ३५ हजार रुपयाचा कॅश डिस्काउंट सोबत १५ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयाचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.

मारुती सुझुकीची सर्वात जास्त विकली जाणारी कार वेगनआर वर या महिन्यात ग्राहकांना ३० हजार रुपयाचा कॅश डिस्काउंट सोबत १५ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयाचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. तर मारुती स्विफ्ट वर ३५ हजार रुपयाचा कॅश डिस्काउंट सोबत १५ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि ४१०० रुपयाचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. मारुती डिझायरवर या महिन्यात फक्त १९ हजार रुपयापर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो.

मारुती सुझुकी सिलेरियो खरेदी करणाऱ्यांना या महिन्यात ३५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट सोबत १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. तर ईकोवर ग्राहकांना १५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट सोबत १० हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि ३१०० रुपयाचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर डीलरशीप लेवलवर दिली जात आहे. तुम्ही शोरूमवर जावून यासंबंधी संपर्क करू शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: तुरुंगातून बाहेत येताच केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान! उद्या घेणार पत्रकार परिषद

Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Ketaki Chitale : केतकी चितळेची ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, लाज कशी वाटत नाही...

GT vs CSK Live IPL 2024 : सीएसकेची अवस्था बिकट; डाव सावरणार मिचेल बाद

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

SCROLL FOR NEXT