maruti suzuki 2022 baleno facelift launched at price of rs 6 35 lakh check features mileage and booking  
विज्ञान-तंत्र

मारुती सुझुकीची 2022 Baleno फेसलिफ्ट लॉन्च, पाहा किंमत अन् फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने आज आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या हॅचबॅक बलेनोची फेसलिफ्ट (baleno facelift) आवृत्ती लॉन्च केली आहे. हे सेगमेंटमधील पहिले हेड-अप डिस्प्ले, सुझुकी कनेक्ट आणि 360 डिग्री व्ह्यू कॅमेरासह बाजारात आणण्यात आले आहे. 2022 बलेनोची सुरुवातीची किंमत 6.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ग्राहकांमध्ये या कारची क्रेझ इतकी आहे की कंपनीला आतापर्यंत 25000 हजार बुकिंग मिळाले आहेत. कंपनीचा दावा आहे की ते 22.9 kmpl चा मायलेज देईल.

10 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री

ही कार बलेनो विकसित करण्यासाठी कंपनीने 1150 कोटींची गुंतवणूक केली आहे. बलेनो पहिल्यांदा भारतात 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्याची 102 देशांमध्ये निर्यातही केली जात आहे. कंपनीने आतापर्यंत 10 लाखांहून अधिक बॅलेनोची विक्री केली आहे. मारुती सुझुकीने भारतात सादर केलेली ही पहिली BSVI कार होती.

पाच कलर ऑप्शन्स

Nexa शोरूमला भेट देऊन Baleno 2022 Maruti Suzuki खरेदी केली जाऊ शकते. ही कार पाच वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये येते. फेसलिफ्टेड बलेनोमध्ये 6 एअर-बॅग, अँटी-हिल कंट्रोल आणि अनेक सुरक्षा फीचर्स देखील आहेत. 2022 Baleno ला सुझुकी लोगो, DRL टेल लॅम्प आणि नवीन अलॉय व्हील्ससह एक मोठा फ्रंट ग्रिल देखील मिळतो.

Baleno 2022 मध्ये हेड-अप डिस्प्ले, 360-व्ह्यू कॅमेरा आणि नवीन 9-इंचाचा SmartPlay Pro+ इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. यात सुझुकी कनेक्ट अलेक्सा व्हॉइस सारखे फीचर्स देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT