Tata Punch
Tata Punch 
विज्ञान-तंत्र

एक लिटर पेट्रोलमध्ये धावतात 26 किमी; पाहा देशातील टॉप मायलेज कार

सकाळ डिजिटल टीम

Best Mileage Cars : देशात पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक इलेक्ट्रिक (Electric Car) किंवा सीएनजी वाहने (CNG) खरेदी करत आहेत. मात्र, यावर्षी अशी पाच पेट्रोल वाहने (fuel-efficient petrol cars) बाजारात दाखल झाली आहेत, ज्यांनी मायलेजच्या बाबतीत सीएनजी वाहनांनाही मागे टाकले आहे. आज आपण अशाच बेस्ट मायलेज देणाऱ्या गाड्यांबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये मारुती सुझुकी सेलेरियो पहिल्या क्रमांकावर आहे, जी 1 लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 26KM पेक्षा जास्त धावते.

मारुति सुजुकी सिलेरियो - 26.68 kmpl

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) ही देशातील सर्वात fuel-efficient cars पेट्रोल कार आहे. हे ARAI सर्टिफाइड 26.68 kmpl मायलेज देते. या हॅचबॅकची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 6.94 लाख रुपयांपर्यंत जाते. ह नवीन मारुती Celerio कारमध्ये 1-लिटर पेट्रोल इंजिन (67PS/89Nm) देण्यात येते, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट - 23.76 kmpl

नवीन पिढीच्या मारुती सुझुकी स्विफ्टला या वर्षाच्या सुरुवातीला फेसलिफ्ट अपग्रेड मिळाली आहे. ARAI च्या मते, ही कॉम्पॅक्ट हॅचबॅक सरासरी 23.76 kmpl चा मायलेज देते. या हॅचबॅकची किंमत 5.85 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.67 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन (90PS/113Nm) देण्यात आले आहे. यात चांगल्या मायलेजसाठी आइडल स्टार्ट-स्टॉपचे फीचर देखील आहे.

Renault Kwid - 22 kmpl

रेनॉल्ट क्विड ही एंट्री-लेव्हल स्पेसमधील सर्वात जास्त फ्यूल इफिशीयंट पेट्रोल कार आहे. या कारचे 1.0-लिटर AMT व्हर्ज 22 kmpl चे ARAI सर्टिफाइड मायलेज देते. या हॅचबॅकची किंमत 4.11 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.66 लाख रुपयांपर्यंत जाते.

Renault Kiger - 20.53 kmpl

नवीन Renault Kiger यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. यात 1.0-लिटर नॅचरली एस्पिरेटेड मोटर आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असे दोन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत. टर्बो पेट्रोलचे मॅन्युअल व्हर्जन 20.53 kmpl फ्यूल इफिशीयंसी (ARAI सर्टिफाइड) देते. या SUV ची किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.09 लाख रुपयांपर्यंत जाते.

टाटा पंच - 18.97 kmpl

टाटा पंच ही कंपनीची मायक्रो-एसयूव्ही आहे, जी या यादीच पाचव्या क्रमांकावर आहे. हे Altroz ​​प्रमाणेच 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) या गाडीत देण्यात आले आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT शी जोडलेले आहे. हे इंजिन 18.97 kmpl चा मायलेज देते. कारची किंमत 5.48 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.08 लाख रुपयांपर्यंत जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भारतीय नागरिकच माझे उत्तराधिकारी- पंतप्रधान मोदी

Karveer Police : गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून; कोल्हापुरात बिनदिक्कतपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री?

HSC RESULT: कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी CA, CS व्यतिरिक्त करा 'हे' कोर्स

Ahmednagar News : ऑनलाईन पद्धतीने तरुणास घटस्फोट; अहमदनगर कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

Cooking Tips: भाजीत तिखट जास्त झाले तर 'असे' करा कमी, चवही होईल द्विगुणित

SCROLL FOR NEXT