Maruti Suzuki WagonR
Maruti Suzuki WagonR Sakal
विज्ञान-तंत्र

ग्राहकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या WagonR चे नवं मॉडेल लवकरच बाजारात

सकाळ डिजिटल टीम

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली सर्वाधिक विकली जाणारी कार WagonR पुढील महिन्यात नवीन बदलांसह सादर करण्याच्या तयारीत आहे. हे बदल नेमके काय असतील याची माहिती समोर आलेली नसली तरी तिच्या डिझाइन आणि इंटीरियरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सध्या मारुती वॅगनआरचे जे मॉडेल बाजारात आहे, ते 2019 मध्ये प्रथम लॉन्च झाले होते. हे मॉडेल 2 वर्षांहून अधिक जुने आहे. नवीन WagonR फेसलिफ्टच्या बाहेरील भागात किरकोळ बदल केले जातील अशी अपेक्षा आहे. टॉप व्हेरियंटमध्ये सुधारित बंपर आणि नवीन डिझाइन केलेले 15-इंच अलॉय व्हील मिळण्याची शक्यता आहे. ही कार नव्या रंगासह येऊ शकते. (Maruti Suzuki is all set to launch its best-selling car WagonR next month with new changes.)

फिचर्स (Features)-

2022 मारुती वॅगनआर फेसलिफ्टच्या डॅशबोर्ड डिझाइनमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. 2022 WagonR ला AMT व्हेरियंट आणि इंजिन आइडल स्टार्ट स्टॉप सिस्टमसह हिल होल्ड असिस्ट मिळू शकतो. Apple Car Play आणि Android Auto सपोर्टसह 7-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ही कार येऊ शकते.

इंजिन (Engine)-

नवीन वॅगनआरच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही. ही कार 2 प्रकारच्या पेट्रोल इंजिन पर्यायांसह येईल.1.0 लिटर आणि 1.2 लिटर 4-सिलेंडरसह ही कार येईल. 1.0 लीटर इंजिन 68bhp पॉवर आणि 90Nm टॉर्क जनरेट करते आणि 1.2L इंजिन 83bhp पॉवरसह येते. त्याच्या ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा समावेश आहे.

मायलेज आणि किंमत (Mileage and price)-

1.0 लिटर पेट्रोल इंजिन असलेली WagonR 22.5 kmpl मायलेज देते आणि 1.2 लिटर इंजिन असलेली WagonR 21.5 kmpl मायलेज देते. सध्याच्या WagonR ची किंमत 4.93 लाख ते 6.45 लाख रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT