Spider-Man 2 PS5 eSakal
विज्ञान-तंत्र

Spider-Man 2 : मार्व्हलच्या 'स्पायडर-मॅन 2' गेमने रचला इतिहास! एका दिवसात विकल्या 2.5 मिलियन कॉपी

यापूर्वी मार्व्हलच्या स्पायडर-मॅन (1) गेमने देखील अशाच प्रकारचा रेकॉर्ड केला होता.

Sudesh

मार्व्हलची बहुप्रतिक्षित स्पायडर-मॅन 2 गेम अखेर रिलीज झाली आहे. एवढंच नाही, तर या गेमने इतिहास रचला आहे. रिलीजनंतर अवघ्या 24 तासांमध्ये या गेमच्या 2.5 मिलियन कॉपी विकल्या गेल्या आहेत. बिझनेस वायरने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

यापूर्वी मार्व्हलच्या स्पायडर-मॅन (1) गेमने देखील अशाच प्रकारचा रेकॉर्ड केला होता. तीन दिवसांमध्ये या गेमच्या 3.3 कॉपीज विकल्या गेल्या होत्या. यानंतर हा रेकॉर्ड याच गेमच्या दुसऱ्या एडिशनने मोडला आहे. यानंतर स्पायडर-मॅन 2 ही गेम प्लेस्टेशनवर सर्वात वेगाने विक्री होणारी गेम झाली आहे.

'गॉड ऑफ वॉर'चा रेकॉर्ड मोडला

यापूर्वी 'गॉड ऑफ वॉर' या गेमने एका दिवसात सर्वाधिक कॉपी विकण्याचा विक्रम केला होता. मात्र आता हा विक्रम स्पायडर-मॅन 2 च्या नावावर झाला आहे. विशेष म्हणजे ही गेम केवळ प्लेस्टेशन-5 वर लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे प्लेस्टेशनने एक्स (ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून सर्व गेमर्स आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

कशी आहे स्पायडर-मॅन 2?

मार्व्हलच्या पहिल्या स्पायडर-मॅन गेमच्या तुलनेत दुसरा भाग मोठा असल्याचं सांगितलं जातंय. गेमच्या मॅपमध्ये क्विन्स आणि ब्रूकलीन ही शहरं देखील जोडण्यात आली आहेत. यामुळे पीटर पार्कर आणि माईल्स मॉरेल्स या पात्रांना अधिक क्वेस्ट मिळणार आहेत. दोन स्पायडर-मॅन म्हणजे डबल मजा; असं गेमर्स म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT