masked aadhaar card for hotel check ins esakal
विज्ञान-तंत्र

Masked Aadhaar Card : हॉटेल किंवा OYO बुकिंग करताय? मास्क आधारकार्ड काय आहे खूपच फायद्याचं,कसं डाउनलोड कराल,पाहा

benefits of masked aadhaar card for hotel check ins : मास्क आधार कार्ड काय आहे आणि याचा वापर कुठे करावा, त्याचे काय फायदे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

Saisimran Ghashi

Masked Aadhaar Card Download : आजच्या डिजिटल युगात वैयक्तिक माहितीचे संरक्षण सर्वांसाठी महत्वाचे आहे. अनेक लोक आपले आधार कार्ड हॉटेल्समध्ये दाखवून नकळतपणे त्यांचा डेटा धोक्यात आणतात. ही एक सवय बनली आहे पण यामुळे माहिती चोरी आणि बँकेच्या फसवेगिरीचा धोका वाढतो. अशा परिस्थितीतून वाचण्यासाठी मास्क केले आधार कार्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो.हे आधार कार्ड नेमक आहे तरी काय आणि याचा वापर करण्याचे काय फायदे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

मास्क आधार म्हणजे काय?

हे तुमच्या आधार कार्डाचे रूपांतरित रूप आहे. यात तुमच्या आधार क्रमांकातील पहिले 8 आकडे लपवले जातात आणि शेवटच्या 4 आकड्यानाच दाखवले जाते. म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती कमी उघडी होऊन सुरक्षित राहते.

मास्क केले आधार का वापरावे?

आधार हे भारतात ओळखपत्र म्हणून वापरले जाणारे महत्वाचे दस्तावेज आहे. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मूळ आधार कार्ड दाखवण्याऐवजी मास्क केले आधार अधिक सुरक्षित पर्याय आहे.

मास्क केले आधार कसे डाउनलोड करायचे?

  • UIDAI ची अधिकृत वेबसाइटवर जा (UIDAI's official website) .

  • 'My Aadhaar' वर क्लिक करा.

  • तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून टाका.

  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला OTP टाका.

  • सत्यापन झाल्यानंतर मास्क केले आधार डाउनलोड करण्याचा पर्याय निवडा.

मास्क केले आधार कुठे वापरावे?

हॉटेल चेक-इन/आउटसाठी वापरू शकता आणि तुमची माहिती सुरक्षित राखण्यासाठी वापरा.

प्रवास करताना,विमानतळावर ओळखपत्र म्हणून दाखवा.

आपली संपूर्ण आधार माहिती उघड न करता हे मास्क केले आधार वापरा आणि तुमच्या माहितीची सुरक्षा करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

Exam Paper Burning: बीडमध्ये कॉपीचे गठ्ठे जाळतानाचे व्हिडिओ समोर; सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई होणार, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ!

Justice for Sahil: "मी त्याला २३ वर्षे एकटीने वाढवलं, जपलं..."; स्टंट करताना स्कॉर्पिओने मुलाला चिरडले, एकट्या आईची न्यायासाठी धडपड

SCROLL FOR NEXT