WhatsApp Fact Check Helpline eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Fact Check Helpline : डीपफेकला बसणार आळा! MCA आणि मेटा मिळून सुरू करणार 'व्हॉट्सअ‍ॅप फॅक्ट-चेक हेल्पलाईन'

Deepfake : निवडणूक काळात याच्या मदतीने फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरण्याचा धोका आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्गज टेक कंपन्यांनी एकत्र येत एक करार केला होता.

Sudesh

MCA Meta ties up for Fact-Check Helpline on WhatsApp : सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे डीपफेकचं प्रमाण वाढलं आहे. निवडणूक काळात याच्या मदतीने फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरण्याचा धोका आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्गज टेक कंपन्यांनी एकत्र येत एक करार केला होता. यानंतर आता MCA आणि मेटा मिळून व्हॉट्सअ‍ॅपवर एक फॅक्ट-चेक हेल्पलाईन सुरू करणार असल्याचं घोषित केलंय.

मिसइन्फर्मेशन कॉम्बॅट अलायन्स (MCA) ही एक क्रॉस-इंडस्ट्री संघटना आहे जी विविध कंपन्या, संस्था आणि उद्योग संघांना चुकीच्या माहितीविरोधात लढण्यासाठी एकत्र आणते. आता एमसीएने मेटासोबत मिळून डीपफेक विरोधात ही नवीन मोहीम राबवली आहे. ही हेल्पलाईन मार्च 2024 पासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Meta Fact-Check)

कशी करणार काम?

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या एखाद्या मेसेजमधील माहिती खरी आहे की खोटी हे तुम्ही या माध्यमातून तपासू शकणार आहात. यासाठी केवळ तुम्हाला तो मेसेज व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटला (WhatsApp Chatbot) पाठवावा लागणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा एआय चॅटबॉट हा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांना सपोर्ट करतो. (WhatsApp Fake Message Detection)

व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर आलेल्या सर्व संदेशांना तपासण्यासाठी MCA एक केंद्रीय डीपफेक विश्लेषण युनिट स्थापन करणार आहे. मेसेजमधील कंटेंट तपासून, त्यातील सत्यता पडताळून तो मेसेज खरा आहे की फेक हे ठरवण्यात येईल. यासाठी एमसीए विविध इंडस्ट्री पार्टनर्स आणि डिजिटल प्रयोगशाळांची मदत घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT