Meta Translator Tool eSakal
विज्ञान-तंत्र

Meta Translator Tool : मेटाने तयार केला 'युनिवर्सल ट्रान्सलेटर'! 100हून अधिक भाषांचा अनुवाद करता येणार

SeamlessM4T : हे टूल स्पीच-टू-स्पीच आणि स्पीच-टू-टेक्स्ट अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींसाठी वापरता येईल.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया जायंट कंपनी मेटाने एक नवीन एआय सिस्टीम मॉडेल तयार केलं आहे. हे एआय मॉडेल तब्बल 100 हून अधिक भाषांचा अनुवाद करू शकतं, असा दावा कंपनीने केला आहे. सीमलेस एमफोरटी असं या टूलचं नाव आहे.

विशेष म्हणजे SeamlessM4T हे स्पीच-टू-स्पीच आणि स्पीच-टू-टेक्स्ट अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींसाठी वापरता येईल. म्हणजेच, हे टूल लिहिलेल्या टेक्स्टचं भाषांतर करु शकेल. सोबतच, ऐकलेल्या गोष्टीचं टेक्स्टमध्ये रुपांतर करण्याची, आणि त्याचं भाषांतर करण्याची क्षमताही यात आहे.

अशा प्रकारचं एआय फीचर तयार करणं हे नक्कीच आव्हानात्मक होतं. कारण यात जवळपास 100 हून अधिक भाषांचा समावेश आहे. यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना अधिक प्रभावीपणे संवाद साधता येणार आहे; असं मेटाने स्पष्ट केलं. सीमलेस M4T मधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे टूल सोर्स लँग्वेज आपोआप डिटेक्ट करू शकणार आहे.

इतर कंपन्यांचेही एआय टूल्स

अशाच प्रकारचे युनिवर्सल स्पीच मॉडेल इतर मोठ्या टेक कंपन्यांनी देखील सादर केलं. यामध्ये अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओपन एआय आणि इतर काही स्टार्टअप कंपन्यांचा समावेश होता. मोझिला कंपनीने देखील मेटाच्या सीमलेस M4T सारखीच एक एआय सिस्टीम तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT