Meta Subscription Plan eSakal
विज्ञान-तंत्र

Meta : फेसबुक अन् इन्स्टाग्रामसाठी मेटाने लाँच केला नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन; महिन्याला द्यावे लागणार 881 रुपये

Meta Subscription Plan : नोव्हेंबरपासून हे प्लॅन लागू होणार आहेत.

Sudesh

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आता नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन लागू झाले आहेत. यामुळे आता या दोन्ही प्लॅटफॉर्मवर जाहिरातींशिवाय कंटेंट पाहता येणार आहे. मेटाने हे अ‍ॅड-फ्री सबस्क्रिप्शन प्लॅन्स कंपनीने युरोपमध्ये लाँच केले आहेत. नोव्हेंबरपासून हे लागू होतील.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम यूजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही यूजर्सना हे प्लॅन्स लागू असतील. दोन्ही डिव्हाईससाठी प्लॅन्सची किंमत सारखीच असणार आहे.

फेसबुक किंवा इन्स्टाग्राम यांपैकी एकाच अ‍ॅपवर अ‍ॅड-फ्री एक्सपिरीयंस हवा असेल, तर त्यासाठी महिन्याला 9.99 युरो (सुमारे 881 रुपये) एवढे चार्जेस असणार आहेत. तर वेबसाईटवर अ‍ॅड-फ्री अनुभवासाठी महिन्याला 12.99 युरो (सुमारे 1,145 रुपये) एवढे चार्जेस असणार आहेत.

लिंक्ड अकाउंटसाठी देखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. अर्थात, यासाठी अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार आहेत. 1 मार्चनंतर लिंक करण्यात आलेल्या अकाउंटना वेब व्हर्जनसाठी महिन्याचे 6 युरो (सुमारे 529 रुपये) तर, अँड्रॉईड आणि आयओएस अ‍ॅप्ससाठी 8 युरो (सुमारे 705 रुपये) एवढे चार्जेस असणार आहेत.

हे प्लॅन सध्या युरोपियन युनियन, युरोपियन इकॉनॉमिक भाग आणि स्वित्झर्लँडमधील यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. भारतात किंवा इतर देशांमध्ये हे कधी उपलब्ध होतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT