Meta Esakal
विज्ञान-तंत्र

Meta: विना जाहिरात इंस्टा अन् फेसबूक स्क्रोल करायचंय मग भरावे लागणार इतके शुल्क

लवकरच कंपनी भारतात आणखी एक सेवा सुरू करणार आहे.

Aishwarya Musale

ट्विटरच्या पार्श्वभूमीवर, मेटाने पेड व्हेरीफिकेशन प्रोग्राम सुरू केला होता. आता कंपनी भारतातील लोकांकडून पैसे घेऊन ब्लूटिक देते.

लवकरच कंपनी भारतात आणखी एक सेवा सुरू करणार आहे. नुकतीच बातमी आली आहे की मेटा EU मध्ये Ads फ्री फेसबुक आणि इंस्टाग्राम लाँच करणार आहे.

आता मिंटच्या एका अहवालानुसार, इंडस्ट्रीशी संबंधित काही लोकांनी ही माहिती शेअर केली आहे की कंपनी भारतातही Ads फ्री सेवा आणणार आहे.

ते भारतात 2024 पासून सुरू होऊ शकते. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

EU मध्ये Ads फ्री सबस्क्रिप्शनचे ट्रायल घेतल्यानंतर, मेटा 2024 च्या मध्यापर्यंत भारतात लॉन्च करू शकते. इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्तीने सांगितले की, सध्या त्याची अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि नुकतेच अधिसूचित डिजिटल पर्सनल डेटा प्रायव्हसी (DPDP) बिल लक्षात घेऊन कंपनी निर्णय घेऊ शकते.

इतके शुल्क आकारले जाऊ शकते

भारतात ads फ्री Facebook आणि Instagram साठी, तुम्हाला 14 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1,165 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, जर तुम्ही या दोन्ही सेवा डेस्कटॉपवर वापरत असाल तर तुम्हाला 17 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1,414 रुपये द्यावे लागतील.

WSJ च्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की कंपनी EU मधील प्रत्येक एडिशनल अकाउंटसाठी वेगळे 6 डॉलर आकारेल. कंपनी भारतातही त्याची अंमलबजावणी करू शकते.

Ads फ्री सब्सक्रिप्शन मॉडल पूर्णपणे ऑप्शनल असेल आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते निवडण्यास सक्षम असाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : दहशतवादी संघटनेच्या नावाखाली ज्येष्ठाला ९९ लाखांचा गंडा; पुणे शहरात 'डिजिटल अरेस्ट'चा नवा धोका

Latest Marathi Breaking News : आजपासून नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम

Solapur Politics: भाजप सोडून कोणासोबतही युती-आघाडीचा निर्णय; साेलापूर जिल्ह्यातील घडामोडींना वेग, राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीकडे लक्ष

Nanded Crime: नांदेड हादरलं! घराच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

Bridal Skin Care: केमिकल नाही, आयुर्वेदिक सिक्रेटने मिळवा ब्राइडल ग्लो, चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक सौंदर्य

SCROLL FOR NEXT