Meta Federal Court Case eSakal
विज्ञान-तंत्र

Meta : फेसबुक-इन्स्टा मुलांना लावतंय व्यसन; तब्बल 41 राज्यांनी 'मेटा'ला खेचलं कोर्टात! काय आहे प्रकरण?

Facebook-Instagram Court Case : या अ‍ॅप्समध्ये दिवसेंदिवस येत असणारे नवीन फीचर्स लहान मुलांना अधिक आकर्षित करत आहेत.

Sudesh

फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया अ‍ॅप्स आता केवळ तरुणाईच नाही तर लहान मुलांच्याही रोजच्या वापरातील झाले आहेत. या अ‍ॅप्समध्ये दिवसेंदिवस येत असणारे नवीन फीचर्स लहान मुलांना अधिक आकर्षित करत आहेत. यामुळे लहान मुलांना याचं व्यसन लागत असल्याचा आरोप अमेरिकेतील कित्येक पालकांनी केला आहे.

यामुळेच अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी सह 41 राज्यांनी मेटा कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. तब्बल 233 पानांच्या फेडरल तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे, की कंपनी आपल्या फायद्यासाठी हे अ‍ॅप्स अधिक अ‍ॅडिक्टिव्ह बनवत आहे. यामुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे.

कोलोराडो, कॅलिफोर्निया आणि अन्य 33 राज्यांनी कॅलिफोर्नियातील फेडरल न्यायालयात याबाबत खटला दाखल केला आहे. तर, वॉशिंग्टन डीसी आणि इतर 8 राज्यांच्या अ‍ॅटर्नी जनरल किंवा स्थानिक न्यायालयांमध्ये विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (Tech News)

अशा प्रकारे लावतंय व्यसन

मेटा कंपनी लहान मुलांना आपल्या अ‍ॅपकडे अधिक आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फीचर्स लाँच करत आहे. यावरील कंटेंट अशा प्रकारे सादर केला जातो आहे, ज्यामुळे मुलं दिवसभर त्याच अ‍ॅप्सवर बसून राहतील. यासाठी कंपनी कंझ्युमर प्रोटेक्शन नियमांचं उल्लंघन करत असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळेच मेटा कंपनीविरोधात पालक आक्रमक झाले आहेत.

कंपनीचं काय मत?

सरकारने थेट कोर्टाची पायरी चढल्यामुळे मेटा कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या वापरासाठी कंपनी वेळोवेळी विविध प्रकारचे नियम लागू करत असते. याबाबत अधिक चर्चा करून, तोडगा काढणं शक्य होतं. मात्र सरकारने असं केलं नाही, असं मेटाच्या प्रवक्त्या लिझा क्रेशाँ यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT