Facebook-Insta Cross App Messaging  eSakal
विज्ञान-तंत्र

Meta : फेसबुक-इन्स्टाग्राममधील मेसेज कम्युनिकेशन होणार बंद; मेटाची मोठी घोषणा

Facebook-Insta : आता जसं इन्स्टाग्रामवरुन फेसबुकवर किंवा फेसबुकवरुन इन्स्टावर मेसेज करता येतात, ते लवकरच बंद होणार आहे.

Sudesh

Facebook-Insta Cross App Messaging : सोशल मीडिया जायंट मेटा कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच फेसबुक आणि इन्स्टाग्राम यामधील क्रॉस-अ‍ॅप कम्युनिकेशन बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच आता जसं इन्स्टाग्रामवरुन फेसबुकवर किंवा फेसबुकवरुन इन्स्टावर मेसेज करता येतात, ते लवकरच बंद होणार आहे.

डिसेंबरच्या मध्यापासून हा बदल लागू होऊ शकतो असं माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे. मेटाने असा निर्णय घेण्याचं कोणतंही ठोस कारण दिलेलं नाही.

जुनी चॅट राहणार सुरक्षित

आता फेसबुक यूजर्स इन्स्टाग्रामवर थेट मेसेज पाठवू शकणार नसले, तरी यापूर्वी दोन्ही अ‍ॅप्सवर मिळून केलेली चॅट सुरक्षित राहणार आहे. आधीचं चॅट डिलीट होणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र, इथून पुढे जर एखाद्या इन्स्टाग्राम यूजरला फेसबुक यूजरशी चॅट करायचं आहे, तर त्याला मेसेंजवर येणं भाग असणार आहे.

2020 साली मेटाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग सुरू करण्यात आलं होतं. यामुळे मेसेंजरवरुन इन्स्टाग्राम हँडल्सना मेसेज करता येत होतं. आता कंपनीने हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या फीचरमुळे आतापर्यंत इन्स्टा रील्स थेट फेसबुक मेसेंजरवर किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करता येत होता. आता क्रॉस-मेसेंजिंग बंद झाल्यानंतर असं करता येईल की नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT