MG Gloster Savvy Sakal
विज्ञान-तंत्र

MG Gloster Savvy 7-सीटर व्हेरियंट भारतात लॉंच, जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ग्राहकांना सर्वोत्तम श्रेणीचा अनुभव देण्याची वचनबद्धता अधिक बळकट करत, एमजी मोटर इंडियाने आज ग्लोस्टर सॅव्हीचे (MG Gloster Savvy) सेव्हन-सीट व्हर्जन लॉंच केले आहे. भारतातील पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल 1) प्रीमियम एसयूव्हीच्या श्रेणीत एमजी ग्लोस्टर सॅव्ही ट्रिमचे नवीन व्हर्जन, या श्रेणीला आणखी बळकटी देणारे ठरणार आहे. तसेच ग्राहकांना एमजीच्या टॉप एंड एसयूव्हीच्या व्यापक श्रेणीतून निवड करण्याचा आणखी एक पर्याय देखील उपलब्ध होणार आहे.

३७.२८ लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) किंमतीची, नवी ग्लोस्टर सॅव्ही सेव्हन सीटर (२+३+२) कॉन्फिगरेशनमध्ये येते. यात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) आणि बोर्गवार्नर ट्रान्सफर केससह अनेक ड्रायव्हिगं मोड येतात. याद्वारे ऑफ रोडिंगच्या क्षमताही वाढतात. यात आयस्मार्ट टेक्नोलॉजी, 64 कलर अँबिएंट लायिटंग, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरुफ, ड्रायव्हर सीट मॅसेंजर आणि इतर अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता यांनी सांगीतले की, “आम्ही ग्राहकांच्या विनंतीला प्रतिसाद देत, ७ सीटर कॉन्फिगरेशनसह ग्लोस्टर सॅव्ही सादर करत आहोत. सध्याच्या ६ सीटर कॉन्फिगरेशनच्या ग्लॉस्टर सॅव्हीमध्ये आणखी भर घालत आम्ही ग्राहकांना त्यांची गरज आणि पसंतीनुसार वाहन निवडण्याची सुविधा देत आहोत.”

७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्हीअंतर्गत ६-सीट काउंटर पार्टप्रमाणेच, २.० ट्विन टर्बो डिझेन इंजिन, जे २०० पीएस पॉवर आणि ४८० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. प्रीमियम एसयुव्हीमध्ये युनिक, इंडस्ट्री फर्स्ट माय एमजी शिल्ड ओनरशिप पॅकेज येते. याअंतर्गत ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या गरजांसह, कार ओनरशिपच्या अनुभवात क्रांती आणली गेली. तसेच ते पर्सनलाईज केले गेले. ग्राहकांना २००+ पर्यायांमधून अतिरिक्त सेवा आणि मेंटेनन्स पॅकेज कस्टमाइज करण्याची संधी देण्याबरोबरच , माय एमजी शील्डच्या स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये तीन वर्ष/१००,००० किलोमीटरची वॉरंटी, ३ वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि ३ वर्षांची ठराविक कालावधी अंतर्गत लेबर फ्री सर्व्हिस उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT