MG Hector Price Drop eSakal
विज्ञान-तंत्र

नवीन कार घेणाऱ्यांसाठी चांगली संधी! MG Hector च्या किंमतीत लाखो रुपयांची घट; पाहा नवी किंमत

MG Hector Plus : हेक्टर आणि हेक्टर+ या दोन्ही कारच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

Sudesh

तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी निर्माण झाली आहे. प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी MG ने आपल्या लोकप्रिय गाडीच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हेक्टर आणि हेक्टर+ या दोन्ही कारच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

ऑटोकार या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, MG Hector कारच्या किंमतीत जास्तीत जास्त 1.29 लाखांपर्यंतची घट झाली आहे. तर, MG Hector Plus या कारच्या किंमतीत 1.37 लाख रुपयांपर्यंतची घट केली आहे. दोन्ही एसयूव्हीच्या डिझेल व्हेरियंटमध्ये ही कपात केली आहे.

किती कमी झाली किंमत?

एमजी हेक्टरच्या बेस व्हेरियंटची किंमत पूर्वी 15 लाख रुपये होती. ही आता कमी होऊन 14.73 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच यामध्ये 27 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या मॉडेलच्या टॉप व्हेरियंटची किंमत पूर्वी 22.72 लाख रुपये होती. ही आता कमी होऊन 21.51 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच यामध्ये 1.21 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे.

MG Hector New Price

एमजी हेक्टर प्लस

हेक्टर प्लसच्या बेस व्हेरियंटची जुनी किंमत 18 लाख रुपये होती. ही आता कमी होऊन 17.50 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच यामध्ये 50 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या मॉडेलच्या टॉप व्हेरियंटची किंमत 23.58 लाख रुपये होती. ही आता कमी होऊन 22.21 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच, यामध्ये तब्बल 1.37 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे.

MG Hector Plus New Price

वरच्या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. हेक्टरच्या दोन्ही मॉडेलमध्ये 143hp क्षमतेचं 2.0 लीटरचं डिझेल इंजिन दिलं आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. या एसयूव्हीमध्ये कित्येक हायटेक फीचर्स मिळतात. गाडीचा खप वाढवण्यासाठी किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT