SUV Hyundai Casper esakal
विज्ञान-तंत्र

Tata Punch ला टक्कर द्यायला येतेय SUV Hyundai Casper, लाँच होण्याधीच जाणून घ्या जोरदार फिचर्स

Hyundai Casper मायक्रो SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टाटा पंचशी स्पर्धेसाठी लवकरच भारतीय बाजारपेठेत उतरेल

साक्षी राऊत

Hyundai Motors या वर्षी आपली नवीन micro SUV Casper भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते, ज्याची सध्या Ai3 या सांकेतिक नावाने चाचणी केली जात आहे. Hyundai Casper मायक्रो SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टाटा पंचशी स्पर्धेसाठी लवकरच भारतीय बाजारपेठेत उतरेल.

लवकरच Hyundai Casper लाँच होणार आहे. कॅस्परची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये असू शकते. मात्र, Hyundai Motor India Limited ने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

मायक्रो एसयूव्हीची बाजारपेठेत मोठी डिमांड

Hyundai Casper CO ची लांबी 3595mm, रुंदी 1595mm आणि उंची 1575mm आहे. ही मायक्रो एसयूव्ही K1 कॉम्पॅक्ट कार प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. कॅस्परला एलईडी डीआरएलसह गोल आकाराचे हेडलॅम्प, खालच्या बंपरमध्ये एलईडी रिंग, सिल्व्हर फिनिश्ड स्किड प्लेट, वाइड एअर डॅम, क्लॅमशेल बोनेट, ड्युअल टोन रूफ टेल, स्क्वेरिश व्हील आर्च आणि ब्लॅक प्लास्टिक क्लेडिंग बॉडीसह मल्टी स्पोक अॅलॉय व्हील आहेत.

कॅस्परचे इंजिन आणि पॉवर

Hyundai Casper मध्ये 1.1-लिटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 69 PS पॉवर जनरेट करते. त्याच वेळी, 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 82bhp पर्यंत पॉवर जनरेट करेल. कॅस्पर 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये लॉन्च केले जाईल. (Automobile)

Hyundai च्या micro SUV मध्ये असतील हे फीचर्स

Hyundai Casper ड्युअल टोन इंटिरियर्स आणि प्रीमियम डॅशबोर्डसह, Android Auto आणि Apple CarPlay सह 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, कीलेस एंट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ड्युअल एअरबॅग्जसह स्टँडर्ड आणि सेफ्टी फिचर्ससह येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT