Microsoft Delhi HC eSakal
विज्ञान-तंत्र

Microsoft : 'आक्षेपार्ह फोटो हटवा..'; केंद्राच्या आदेशानंतर मायक्रोसॉफ्टची हायकोर्टात धाव; म्हणे आमच्याकडे त्यासाठी टेक्नॉलॉजी नाही..

मायक्रोसॉफ्ट सोबतच गुगलने देखील अशाच प्रकारची अपील या न्यायालयात दाखल केली आहे. आज ही याचिका सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.

Sudesh

Microsoft Moves to HC : टेक जगतातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट ही केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पोहोचली आहे. केंद्राने सर्च इंजिन कंपन्यांना विशेष यूआरएलवर जबरदस्ती न करता इंटरनेटवरुन सहमती नसणाऱ्या अश्लील फोटोंना (NCII) सक्रियपणे हटवण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश लागू करणं टेक्निकली शक्य नसल्याचं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे.

मायक्रोसॉफ्ट सोबतच गुगलने देखील अशाच प्रकारची अपील या न्यायालयात दाखल केली आहे. आज ही याचिका सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. आज या दोन्ही प्रकरणांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी यापूर्वी एका खटल्यात सोशल मीडिया कंपन्यांना इशारा दिला होता. सहमती नसणाऱ्या अश्लील कंटेंटला हटवण्याची सूचना त्यांनी आयटी नियमांअंतर्गत दिली होती. यासाठी दिलेल्या वेळामध्ये जराही दिरंगाई चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं होतं.

यावेळी न्यायालयाने मायक्रोसॉफ्टचं 'बिंग' आणि गुगलला मेटाचं उदाहरण दिलं होतं. मेटाने ज्याप्रमाणे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह कंटेंट हटवतं, त्याचप्रमाणे तुम्हीही असा कंटेंट हटवा असं न्यायालयाने म्हटलं होतं.

"आमच्याकडे टेक्नॉलॉजीच नाही"

मायक्रोसॉफ्टने या निर्णयाला आव्हान देत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांचं म्हणणं आहे, की आमच्याकडे अशा प्रकारे कंटेंट डिलीट करण्यासाठी मेटासारखी टेक्नॉलॉजीच उपलब्ध नाही.

अर्थात, टेक्नॉलॉजी नाही असं म्हणून तुम्ही आपली जबाबदारी झटकू शकत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या या पवित्र्यानंतर आता कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT