Microsoft Layoff eSakal
विज्ञान-तंत्र

Microsoft Layoff : अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड आणि एक्सबॉक्समधील तब्बल 1,900 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय - रिपोर्ट

मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग डिव्हिजनचे सीईओ फिल स्पेन्सर यांच्या एका मेमोचा हवाला देत याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Sudesh

Activision Blizzard Xbox Layoff : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कित्येक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. यामध्येच आता मायक्रोसॉफ्टचाही नंबर लागला आहे. अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड आणि एक्सबॉक्स या आपल्या कंपन्यांमधील तब्बल 1,900 कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने काढून टाकलं आहे.

दि व्हर्ज या न्यूज वेबसाईटने याबाबत रिपोर्ट दिला आहे. मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग डिव्हिजनचे सीईओ फिल स्पेन्सर यांच्या एका मेमोचा हवाला देत याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कंपनीने मुख्य कारवाई अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिझार्डवर केली असली, तरी यामध्ये एक्स बॉक्स आणि झेनीमॅक्सच्या काही कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग डिव्हिजनमध्ये सुमारे 22,000 कर्मचारी काम करतात. लेऑफ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे आठ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे.

"अ‍ॅक्टिव्हिजन, ब्लिझार्ड आणि किंग या टीम्स मायक्रोसॉफ्टमध्ये सहभागी होऊन आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. 2024 मध्ये पुढे जात असताना, मायक्रोसॉफ्ट गेमिंग आणि अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिझार्डच्या स्ट्रॅटजीमध्ये काही बदल होणं गरजेचं आहे. आपल्या वाढत्या बिझनेसला सपोर्ट करेल असं कॉस्ट स्ट्रक्चर तयार करण्याची गरज सध्या आहे. आम्ही मिळून याबाबत चर्चा केली आहे. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं यावरही एकमत झालेलं आहे. याचाच भाग म्हणून आम्हाला हा दुःखद आणि त्रासदायक निर्णय घ्यावा लागणार आहे." असं मत स्पेन्सर यांनी व्हर्जशी बोलताना व्यक्त केलं.

"गेमिंग लीडरशीप टीम आणि मी ही प्रक्रिया अगदी विचापूर्वक पार पाडणार आहे. याचा फटका ज्या कर्मचाऱ्यांना बसेल, त्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. स्थानिक कायद्यानुसार त्यांना कंपनीकडून मदत करण्यात येईल." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

सोनम कपूरच्या घरी आला गोड पाहुणा, अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Satara ZP Controversy : मोठी बातमी! सातारा SP तुषार दोषींना 'सक्तीची रजा'; मंत्री शंभूराज देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारची कारवाई

SCROLL FOR NEXT