Microsoft Server Down IT minister Ashwini Vaishnaw says in touch with Microsoft to resolve outage  esakal
विज्ञान-तंत्र

Microsoft Windows Crash: विंडोज सुरू होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार ? भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, मायक्रोसॉफ्टने दिले स्पष्टीकरण

Microsoft Server Down मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्याने जगभरातील अनेक बँक, आयटी, मीडिया, एअरलाईन्सची सेवा विस्कळीत झाली.

सकाळ डिजिटल टीम

मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्याने जगभरातील अनेक बँक, आयटी, मीडिया, एअरलाईन्सची सेवा विस्कळीत झाली. याचा फटका भारतालादेखील बसला. कम्प्युटर आणि लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन दिसू लागल्यामुळं मोठी समस्या निर्माण झाली आहे. विंडोज सुरू होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार अशी नवी अपडेट समोर आली असून भारत सरकारने मोठी निर्णय घेतला आहे. (Microsoft Server Down IT minister Ashwini Vaishnaw says in touch with Microsoft to resolve outage )

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर ठप्प झाल्यानंतर केंद्र सरकार मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय, केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव देखील या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांकडून सातत्याने माहिती घेत आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट ज्या फाल्कन सॉफ्टवेअरचा वापर करते त्यात एक नाव अपडेट आला आहे. हा अपडेट केल्यावर फाल्कन वापरल्या जाणाऱ्या सर्व ठिकाणी हा प्रॉब्लेम आला आहे. आणि यामध्ये सुधारणा होण्यासाठी ५ ते १० तास लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच, भारत सरकारच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला(NIC ) याचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण NIC फाल्कनची सेवा घेत नाही.

मायक्रोसॉफ्टने दिलं स्पष्टीकरण

CrowdStrike ने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे. CrowdStrike च्या प्रतिनिधीने एक विधान जारी केले आहे की, विंडोज चालवणाऱ्या मशीनवर BSOD समस्या उद्भवणाऱ्या एका व्यापक समस्या निर्माण झाली.

मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद झाल्याचा काय परिणाम झाला?

  • अमेरिकेत 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.

  • भारतातील हवाई सेवेवरही परिणाम, ऑपरेशन्स मॅन्युअली केली जात आहेत.

  • स्काय न्यूजने प्रसारण बंद केले.

  • 74% वापरकर्ते मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये लॉग इन करू शकत नाहीत.

  • बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आउटलेट्स आणि एअरलाइन्स सेवा जर्मनीमध्ये प्रभावित झाल्या आहेत.

  • लंडन स्टॉक एक्सचेंज ठप्प

  • दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या बँक कॅपिटेकच्या सेवा प्रभावित

  • स्पेनमधील सर्व विमानतळांवर सेवा प्रभावित, दुबईमध्येही प्रभावित

  • 911 सेवा देखील अमेरिकेत पूर्णपणे बंद झाली

  • ब्रिटनमध्येही रेल्वे सेवा बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT