Global CrowdStrike Outage Leads to Refunds, Not Full Compensation esakal
विज्ञान-तंत्र

Microsoft Crash Refund : मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या भीषण आउटेजमुळे क्राउडस्ट्राइक वापरकर्त्यांना फटका! रिफंड मिळणार की नाही? काय आहे कंपनीची पॉलिसी

Microsoft Outage Impact : मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सुरक्षा अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे विंडोज क्रॅश झाले आणि जगातील लाखो कंपन्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Saisimran Ghashi

CrowdStrike Outage Refund : मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सुरक्षा अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे विंडोज क्रॅश झाले आणि जगातील लाखो कंपन्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यामध्ये हवाई प्रवासामध्ये व्यत्यय, रुग्णालयांमधील वैद्यकीय नोंदणी अडवल्या गेल्या आणि काही ठिकाणी 911 सेवाही खंडित झाल्या.

पण या सर्वांसाठी क्राउडस्ट्राइक कंपनीला जबाबदार धरण्याचा विषयच उद्भवत नाही. कारण कंपनीच्या नियम व अटी (Terms and Conditions) नुसार, ते फक्त तुम्ही भरलेल्या शुल्काची परतफेड करणार आहेत.

क्राउडस्ट्राइकच्या फाल्कन नावाच्या सुरक्षा सॉफ्टवेअरचा अनेक कंपन्या आणि सरकारी संस्था वापर करतात. या सॉफ्टवेअरच्या अटींमध्ये असे म्हटले आहे की, कंपनी फक्त तुम्ही भरलेल्या शुल्का इतकीच जबाबदारी घेईल. म्हणजेच तुमच्या नुकसानीची भरपाई किंवा खराब झालेला व्यवसाय यासाठी तुम्हाला काहीही मिळणार नाही.कोणतेही अतिरिक्त रिफंड म्हणजेच नुकसान भरपाई मिळणार नाही.

woods Rogers येथील सायबरसुरक्षा आणि डाटा गोपनीयता क्षेत्राच्या प्रमुख एलिझाबेथ बर्जीन वालर यांनी ही माहिती दिली आहे. त्या म्हणतात, "क्राउडस्ट्राइक फक्त तुम्ही भरलेल्या पैशांची परतफेड करेल."

क्राउडस्ट्राइक वापरणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी मात्र वेगळे करार केले असतील तरच ही गोष्ट लागू आहे. अशा करारांची माहिती सार्वजनिक झालेली नाही. पण अशा करारांमुळे क्राउडस्ट्राइकवर अधिक जबाबदारी निश्चित होऊ शकते.

क्राउडस्ट्राइकने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. क्राउडस्ट्राइकच्या या चुकीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी सायबर विमा (Cyber Insurance) कंपनीकडे जाणे हाच सर्वसामान्य कंपन्यांसाठी पर्याय आहे. अशा विम्यामध्ये नुकसानीची भरपाई केली जाते.

वॉलर यांच्या मते, अशा घटनांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. पण अनेक विमा कंपन्या फक्त हॅकिंगसारख्या घटनांमध्येच भरपाई देतात. त्यामुळे या प्रकरणी विमा कंपन्यांविरुद्ध खटले दाखल होण्याची शक्यता आहे.

क्राउडस्ट्राइकवरही वेगवेगळे परिणाम होण्याची शक्यता आहे. गुंतवणदार, नुकसान भरपाई हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे ग्राहक आणि कदाचित SEC (Securities and Exchange Commission) यांची चौकशी अश्या काही परिणामांची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT