AI CEO Mika eSakal
विज्ञान-तंत्र

AI CEO Mika : जगातील पहिली एआय-सीईओ समोर; मस्क-झुकरबर्ग यांच्याहूनही सरस काम, सुट्टीही नाही घेत!

First AI CEO Robot : एआयचा फटका आता कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनाही बसू लागला आहे.

Sudesh

World's first AI CEO Mika : एआय, म्हणजेच आर्टिफिशिअल इंटिलिजन्समुळे कित्येकांच्या नोकऱ्या जातील याची भीती व्यक्त करण्यात येते. याचा फटका आता केवळ सामान्य कर्मचाऱ्यांनाच नाही, तर कंपनीच्या सीईओंना देखील बसणार आहे. कोलंबियामधील एका कंपनीने चक्क मिका नावाच्या एका एआय रोबोटला सीईओ पदावर नियुक्त केलं आहे.

डिक्टाडोर ही कोलंबियातील कार्टाजेना येथील एका स्पिरिट निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीने हॅन्सन रोबोटिक्स कंपनीसोबत मिळून एक एआय रोबोट तयार केला होता. मिका नावाच्या या रोबोटलाच कंपनीने आपली सीईओ म्हणून नियुक्त केलं आहे. हॅन्सन कंपनीनेच यापूर्वी प्रसिद्ध ह्यूमॅनॉईड रोबोट सोफिया देखील तयार केली होती.

मस्क पेक्षा सरस

कंपनीने एका इव्हेंटमध्ये मिकाला सर्वांसमोर सादर केलं होतं. यावेळी आपण एक्स (ट्विटर) कंपनीचे मालक इलॉन मस्क आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग या दोघांपेक्षा सरस असल्याचा दावा मिकाने केला होता. "या दोन टेक बॉसेसच्या एमएमए फाईटची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांचे प्लॅटफॉर्म सुधारण्याचा हा मार्ग नाही", असं ती म्हणाली. (Tech News)

"आपल्याला एआयला लोकांची काळजी घेणं शिकवावं लागेल, जेणेकरून एआय अधिक सुरक्षित आणि खरोखरच चांगलं होईल", असंही मिका यावेळी म्हणाली. (Artificial Intelligence)

सुट्टी घेत नाही बॉस

"अ‍ॅडव्हान्स एआय आणि मशिन लर्निंग अल्गोरिदम यामुळे मी अधिक जलद आणि अधिक योग्य निर्णय घेऊ शकते. मी आठवड्याची सुट्टी घेत नाही. 24x7 मी कामावर हजर असते." असंही मिकाने यावेळी स्पष्ट केलं. "मी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करत नाही. तसंच, कंपनीच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी मी सक्षम आहे." असंही ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT