Mobile Tips Sakal
विज्ञान-तंत्र

Mobile Tips: तुमचाही फोन सारखा हँग होतोय? मग वापरा 'या' टिप्स

Mobile Tips: जर तुमचा फोन देखील सारखा हँग होत असेल तर काही सोप्या पद्धतींचा वापर करून नवा करू शकता.

Puja Bonkile

Mobile Tips: आजकाल सर्वांनाकडेच फोन आहे. सुरूवाती सर्वच फोन सुरळित काम करतात. पण काही वेळाने फोनमध्ये समस्या येऊ लागतात. जर तुमचा फोन देखील एखाद्या समस्येमुळे हँग होत असेल तर तुम्हाला नवीन फोन घेण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून फोन चांगला करू शकता. या टिप्स कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

फोटो आणि व्हिडिओ जास्त

तुम्ही तुमच्या फोनमधील फोटो आणि व्हिडिओ क्लिअर ​​करू शकता. अनेक वेळा जास्त फोटो आणि व्हिडिओ फोनमध्ये असल्याने हँग होऊ लागतो. यामुळे गरज नसलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट केल्यास फोन हँग होत नाही.

अप्स डाउनलोड करू नका

अनेक वेळा आपण आपल्या फोनमध्ये खूप जास्त ॲप्स डाउनलोड करतो. यामुळे फोन हँग होऊ शकतो. फोनमध्ये जास्त ॲप्स डाउनलोड करणे टाळावे. ज्या अप्सची गरज असते तेच अप्स फोनमध्ये ठेवावे.

कमी स्टोरेज

तुम्ही जास्त स्टोरेज असलेला फोन खरेदी करू शकता. अनेक वेळा कमी स्टोरेजमुळे फोन हँग होऊ लागतो. जर तुमच्याकडे जास्त स्टोरेज असलेला फोन असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जेव्हा फोनचे स्टोरेज 80% पेक्षा जास्त भरलेले असते तेव्हा फोन हँग होऊ लागतो. वेळोवेळी त्या गोष्टी डिलिट करत राहा ज्याचा आता तुम्हाला उपयोग नाही.

 फोन जास्त गरम झाल्यास काय होते? 

अनेक वेळा आपण फोन रात्रभर चार्जिंगला ठेवतो. तुम्हीही असे करत असाल तर तुमची ही सवय बदलायला हवी. अतिउष्णतेमुळे फोनही हँग होतो. ओव्हरहाटिंग टाळण्यासाठी तुम्ही फोन फक्त 80 टक्के चार्ज करावा. तसेच फोन रात्रभर चार्जिंगला ठेवू नये.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT