Mobile Vibration Esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Vibration : खिशात मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचा होतोय भास? गंभीर आजाराचं आहे लक्षण

सतत मोबाईल वापरल्यामुळे तो आपल्या शरीराचाच भाग आहे, असं लोकांना वाटू लागतं.

Sudesh

बऱ्याच वेळा आपल्याला खिशात मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचा भास होतो. आपण खिशातून मोबाईल काढून पाहतो, मात्र कोणताही कॉल किंवा नोटिफिकेशन आलेली नसते. आपल्यापैकी कित्येकांसोबत एकदा तरी असं झालेलंच आहे. मात्र हीच गोष्ट वारंवार होत असेल, तर हा एक गंभीर आजार असू शकतो.

जॉर्जिया विद्यापीठाने केलेल्या एका रिसर्चनुसार, जगभरातील सुमारे ९० टक्के मोबाईल यूजर्सना किमान एकदा तरी असा अनुभव आला आहे. सतत मोबाईल वापरल्यामुळे तो आपल्या शरीराचाच भाग आहे, असं लोकांना वाटू लागतं. यामुळे मग अचानक एखाद्या वेळी फोन व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतं असं संशोधकांनी म्हटलं आहे.

चष्म्याचं दिलं उदाहरण

याबाबत अधिक माहिती देत असताना शास्त्रज्ञांनी चष्म्याचं उदाहरण दिलं. एखाद्या चष्मा वापरणाऱ्या व्यक्तीला कधी कधी आपल्या डोळ्यावर चष्मा असलेलंही लक्षात राहत नाही. कारण या व्यक्तीला चष्म्याची एवढी सवय झालेली असते, की तो त्याच्या शरीराचा भागच वाटतो. मोबाईलचा अतिवापर (Mobile excessive use) केल्यामुळेही असंच होत आहे.

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम

या आजाराला शास्त्रज्ञांनी फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम (Phantom Vibration Syndrome) असं नाव दिलं आहे. रिसर्चमध्ये असं दिसून आलं, की एखाद्या मेसेज किंवा कॉलची वाट पाहत असताना अशा प्रकारचे भास अधिक होतात. काही लोकांना दिवसभरात दोन-तीन वेळा हे भास होतात, तर काहींना आठवड्यातून एक-दोन वेळा.

काय आहे धोका?

सध्या आपण सर्वच गोष्टींसाठी मोबाईल वापरत असल्यामुळे फँटम व्हायब्रेशन ही अगदी सामान्य बाब झाली आहे. थोड्या प्रमाणात असं होणं ही धोक्याची बाब नसली, तरीही याचं प्रमाण वाढल्यावर मात्र खबरदारी घेणं गरजेचं आहे. अ‍ॅन्झायटी, अस्वस्थता अशा आजारांचं हे लक्षण असू शकतं.

तुम्हालाही असे भास वारंवार होत असतील, तर वेळीच मोबाईलचा वापर कमी करावा. अगदीच गरज भासल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT