Bharat 5G Portal eSakal
विज्ञान-तंत्र

Bharat 5G Portal : मोदी सरकारने लाँच केलं 'भारत 5G पोर्टल'; क्वांटम, आयपीआर आणि 6G रिसर्चसाठी होणार मदत

हे पोर्टल म्हणजे सर्व क्वांटम, आयपीआर, 5G, 6G अशा विषयांवरील संशोधन आणि इतर कामांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन असणार आहे, असं मित्तल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Sudesh

Bharat 5G Portal : केंद्र सरकारने भारतात 5G लाँच केल्यानंतरच 6G तंत्रज्ञानावर काम सुरू केलं होतं. मात्र, आता यासोबतच क्वांटम आणि आयपीआर या गोष्टींच्या रिसर्चसाठी देखील केंद्राने प्रस्ताव मागवले आहेत. या प्रस्तावांसाठी दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांनी मंगळवारी 'भारत 5G पोर्टल' लाँच केलं.

हे पोर्टल म्हणजे सर्व क्वांटम, आयपीआर, 5G, 6G अशा विषयांवरील संशोधन आणि इतर कामांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन असणार आहे, असं मित्तल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

"भारतातील 5G हे जगातील सर्वात वेगवान आहे. 6G तंत्रज्ञानावर देखील आधीपासूनच काम सुरू आहे. भारतात जगातील सर्वात मोठं टेलिकॉम नेटवर्क आहे. सर्वात कमी वेळात स्वदेशी 4G आणि 5G तंत्रज्ञान विकसित करुन देशाने जगाला आश्चर्यचकित केलं आहे." असं मित्तल यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "भारतात आज एक लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. इतर देशांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आणि कोलॅबरेट करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. भारत हा एक विश्वासार्ह सहकारी असल्याचा अनुभव आतापर्यंत जगभरातील कित्येक देशांनी घेतला आहे. यामुळेच 5G असो किंवा 6G असो, याबाबत प्रत्येकाला भारतासोबत मिळून काम करायचं आहे."

टेलिकॉम सेक्टरमध्ये गुंतवणुकीची संधी

भारत सरकार हे टेलिकॉम सेक्टरमध्ये स्टार्टअप्सना गुंतवणुकीची संधी देत आहे. "ब्रिजिंग ड्रीम्स अँड फंडिंग : लिंकिंग व्हेंचर कॅपिटल" या अभियानाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना स्टार्टअपच्या भविष्याशी जोडलं जाणार आहे. यासाठीच्या बैठक सत्राची सुरूवात मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुमारे 26 स्टार्टअप कंपन्यांनी आपली उत्पादने सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT