Robotics India eSakal
विज्ञान-तंत्र

Robotics : रोबोटिक्स क्षेत्रासाठी मोदी सरकार घेणार पुढाकार; आर्थिक मदतही मिळणार - रिपोर्ट

Modi Government : अमेरिका, जपान, चीन अशा देशांच्या तुलनेत रोबोटिक्स क्षेत्रात आपण मागे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sudesh

सध्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. जगभरातील कित्येक टेक कंपन्या आता भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. केंद्र सरकार देखील या क्षेत्रामधील आपली गुंतवणूक वाढवत आहे.

काही दिवसांपूर्वीच भारत स्वतःच सेमीकंडक्टर तयार करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता रोबोटिक्स क्षेत्राबाबत देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रोबोट तयार करण्यासाठी एक राष्ट्रीय नीती आखण्याची तयारी मोदी सरकार करत आहे. या माध्यमातून रोबोटिक्स क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तींना, रोबोट तयार करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळणार आहे. अमेरिका, जपान, चीन अशा देशांच्या तुलनेत रोबोटिक्स क्षेत्रात आपण मागे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.

देशात तयार होणार इकोसिस्टीम

रोबोटिक्स क्षेत्रामध्ये कच्च्या मालापासून रोबोट निर्मितीपर्यंत एक संपूर्ण इकोसिस्टीम सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी रोबोटिक्स इनोव्हेशन युनिटची (आरआययू) स्थापना करण्यात येईल.

हे केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अखत्यारित राहून एक स्वतंत्र्य संस्था म्हणून काम करेल. रोबोटिक्सशी संबंधित व्हॅल्यू चेन स्थापित करण्यासाठी फंडिंग तसेच इतर मदत करण्याचं काम आरआययू करेल.

कच्च्या मालासाठी मिळणार मदत

रोबोट तयार करण्यासाठी एडव्हान्स तंत्रज्ञान, एक्चुएटर्स, मोटर्स, गिअरबॉक्स, पीसीबी, बॅटरी, सेन्सर्स असं सगळं सामान गरजेचं असतं. सध्या भारतात अशा प्रकारच्या सामानाची सप्लाय चेनच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे परदेशातून हे सामान आयात करावं लागतं, जे खर्चिक आहे. त्यामुळे सरकार अशा कच्च्या मालासाठी मदत करू शकतं, असं म्हटलं जात आहे.

रोबोटची मागणी वाढली

जगात सध्या रोबोटिक्स क्षेत्राची उलाढाल ही तब्बल 6.7 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. 2021 या वर्षामध्ये प्रोफेशनल रोबोट्सचे जगभरात 1.2 लाख युनिट विकले गेले. भारतात सध्या हॉस्पिटल्सपासून ऑटोमोबाईल क्षेत्रापर्यंत रोबोटचा वापर होतो आहे. मात्र, जागतिक वापराच्या तुलनेत ही संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळेच आता सरकार या क्षेत्राकडे लक्ष देण्याचा विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT