isro esakal
विज्ञान-तंत्र

Chandrayan-3: 'विक्रम'ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नोंद केल्या विचित्र हालचाली; नेमका अर्थ काय?

कार्तिक पुजारी

Moon Lander Vikram Records Event Appears Natural Under Investigation ISRO

नवी दिल्ली- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवण्यात आलेला चांद्रयान-३ भारतीय अवकाश संशोधन संस्थेला ISRO वेगवेगळी माहिती पाठवत आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चंद्रावर काही विचित्र हालचाली यानाला आढळून आल्या आहेत. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी याला नैसर्गिक हालचाली म्हटलं असून याप्रकरणात अधिक संशोधन सुरु असल्याचं म्हटलं आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला होता. दक्षिण ध्रुवाबाबत जग आतापर्यंत अनभिन्न होतं. चांद्रयान-३ दक्षिण ध्रुवावरील महत्त्वाची माहिती इस्त्रोकडे पाठवत आहे. यानाने सल्फर, ऑक्सिजन अशा महत्त्वाच्या मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. चांद्रयान-३ वर असलेल्या लूनर सेसमिक अॅक्टिविटी पेलोडने (आयएलएसए) २५ आणि २६ ऑगस्ट रोजी एक वेगळी हालचाल नोंद केली आहे. ही नैसर्गिक गोष्ट असेल असा प्राथमिक अंदाज वैज्ञानिकांना आहे.

आयएलएसएने चंद्रावरील काही कंपने नोंद केली आहेत. अशी कंपने भूकंप किंवा इतर वस्तुंच्या हालचालीमुळे किंवा कृत्रिम हालचालींमुळे नोंद होत असतात. चंद्रामध्ये निर्माण झालेल्या कंपनामुळेही अशी नोंद होऊ शकते. पण, शास्त्रज्ञ या संबंधात अधिक संशोधन करुन मूळ कारणांचा शोध घेत आहेत.

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रावर पाठवण्यात आलेला मायक्रो इलेक्ट्रो मॅकेनिकल सिस्टिम (एमईएमएस) तांत्रितदृष्या रोवर आणि दुसऱ्या पेलोडच्या हालचालींवर लक्ष ठेवत असते. भारताचे चांद्रयान-३ २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते. चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश आहे.

तांत्रिक कारण

इस्त्रोच्या माहितीनुसार आयएलएसए चंद्रावरील भूकंपन संबंधी हालचालींवर लक्ष ठेवते. हे नैसर्गिक भूकंप, कोणत्या वस्तूच्या प्रभावामुळे कंपन किंवा कृत्रिम हालचालींमुळे कंपने अशी स्थिती नोंद करते. असे असले तरी नेमका स्त्रोत इस्त्रो शोधत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT