Reliance Jio Sakal
विज्ञान-तंत्र

दररोज 1, 2 आणि 3GB डेटा, हे आहेत Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

Reliance Jio कडे दररोज 1GB ते 3GB डेटा ऑफर करणारे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. या व्यतिरिक्त, जिओकडे व्हॅल्यू प्लॅन देखील आहेत. व्हॅल्यू प्लॅनमध्ये ग्राहकांना मर्यादित डेटा दिला जातो आणि म्हणून ते किफायतशीर देखील असतात. आज आपण दररोज 1GB, 2GB आणि 3GB डेटा देणाऱ्या Jio च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. या प्लॅनची प्रतिदिन किंमत सर्वात कमी असून यामध्ये ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देणाऱ्या योजना वगळल्या आहेत.

दररोज 1 GB डेटा देणारा सर्वात स्वस्त प्लॅन

हा रिलायन्स जिओचा फक्त एक रिचार्ज प्लॅन आहे जो दररोज 1 जीबी डेटा ऑफर करतो. हा प्लॅन 149 रुपयांचा आहे. या प्लॅनची ​​वैधता 24 दिवस आहे. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवसाची किंमत 6.2 रुपये आहे. प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा उपलब्ध, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमीटेड कॉलिंगचा लाभ मिळण्यासोबतच दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच, जिओ अॅप्स सबस्क्रिप्शन फ्री उपलब्ध आहे.

दररोज 2 GB डेटा देणारे सर्वात स्वस्त प्लॅन

रिलायन्स जिओकडे 4 अशा प्लॅन आहेत, ज्यात दररोज 2 GB डेटा दिला जातो आणि ते डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनशिवाय येतात. हे प्लॅन 249 रुपये, 444 रुपये, 599 रुपये आणि 2,399 रुपये किंमतीचे आहेत. त्यापैकी 2,399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वात किफायतशीर आहे. या प्लॅनची ​​रोजची किंमत 6.57 रुपये आहे. प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा उपलब्ध तसेच कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल, प्लॅन दररोज 100 एसएमएस मिळतात. तसेच, जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

प्रत्येक दिवस 3GB डेटा देणारे सर्वात स्वस्त प्लॅन

रिलायन्स जिओकडे असे 3 प्लॅन आहेत, ज्यात दररोज 3GB डेटा दिला जातो आणि ते डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनशिवाय येतात. हे प्लान 349, 999 आणि 3,499 रुपयांचे आहेत. प्रत्येक दिवसाच्या किंमतीनुसार, त्यापैकी सर्वात स्वस्त प्लॅन 3,499 रुपयांचा आहे. 3,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोजचा खर्च ९.५ रुपये असेल. प्लॅनमध्ये एकूण 1095GB डेटा उपलब्ध आहे. कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. तसेच, Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT