Hanger 18 Esakal
विज्ञान-तंत्र

Area 51 नाही, तर 'ही' आहे पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित जागा; लोक म्हणतात इथं दडवून ठेवलेत एलियन्स

अमेरिकेकडे खरोखरच एलियन्स आहेत अशा अफवा लोकांमध्ये पसरलेल्या आहेत.

Sudesh

कोणत्याही गूढ गोष्टीबाबत लोकांना कायम आकर्षण वाटत असतं. अशा गूढ गोष्टींपैकी एक म्हणजे एलियन्स. दुसऱ्या ग्रहावर एलियन्स असतील का, इथपासून ते पृथ्वीवर एलियन्स उतरलेत का इथपर्यंत कित्येक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा लोक प्रयत्न करत असतात. कित्येक लोक तर आपण एलियन पाहिल्याचा दावाही करतात. यातूनच मग अनेक कन्स्पिरन्सी थिअरीजचा जन्म होतो.

हॉलिवूडमध्ये एलियन्स बाबत अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. कदाचित यामुळेच अमेरिकेकडे खरोखरच एलियन्स आहेत, आणि शास्त्रज्ञ त्यांवर प्रयोग करून पाहत आहेत अशा अफवा लोकांमध्ये पसरलेल्या आहेत. सोशल मीडियावर असा दावा करणारे कित्येक लोक दिसून येतात. या सगळ्या चर्चांमध्ये अमेरिकेतील एका जागेचा उल्लेख वारंवार येतो. ही जागा म्हणजे, एरिया ५१. मात्र याव्यतिरिक्त आणखी एक जागा आहे, ज्याठिकाणी एलियन्स असल्याचा दावा अनेक अधिकाऱ्यांनी केला आहे.

राईट-पॅटर्सन बेस

अमेरिकेतील राईट-पॅटर्सन एअर फोर्स बेस ही जागा देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानलं जातं. याठिकाणी असलेल्या एका इमारतीमध्ये परग्रहवासियांच्या मृतदेहावर प्रयोग केले जात असल्याचा दावा आतापर्यंत कित्येकांनी केला आहे.

यूएफओ दुर्घटना

१९४७ साली जुलै महिन्यात अमेरिकेतील न्यू-मेक्सिकोमध्ये यूएफओ म्हणजेच उडती तबकडी क्रॅश झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामध्ये काही एलियन्सचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं होतं. मात्र, तेव्हा रोझवेल आर्मी एअर फील्डने हा एक हवामानावर लक्ष ठेवणारा बलून असल्याचा दावा केला होता.

पुढे १९९४ मध्ये अमेरिकेच्या वायुसेनेने हा दावा खोटा असल्याचं सांगितलं. हा यूएफओ म्हणजे सोव्हिएत युनियनने पाठवलेला स्पाय बलून होता असं या नवीन रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं.

अधिकाऱ्यांचे दावे

अमेरिकेने कधीही याबाबत अधिकृत माहिती दिली नसली, तरीही वायुसेनेतील कित्येक अधिकाऱ्यांनी याबाबत वेगवेगळे दावे केले आहेत. ऑलिव्हर हँडरसन नावाच्या एका माजी अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला सांगितलं होतं, की त्याने राईट-पॅटर्सन बेसवर नेलेल्या एका विमानात एलियन्सचे मृतदेह होते. यासोबतच क्रॅश झालेल्या यूएफओचे काही भागही यात होते.

आणखी एका अधिकाऱ्याने असं म्हटलं होतं, की १९४७ साली राईट फील्ड भागामध्ये एक जिवंत एलियन आढळला होता. मात्र, दुर्दैवाने अमेरिकेच्या सैन्याने त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर प्रयोग केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. १९६४ साली तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या एका उमेदवाराने म्हटलं होतं, की आपण 'ब्लू रूम'मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र एका जनरलने आपल्याला अडवलं.

हँगर १८

राईट-पॅटर्सन बेसवर असलेल्या हँगर १८ या इमारतीमध्ये एलियन्सच्या बॉडी ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातं. यासोबतच, याठिकाणी अमेरिकेच्या सैन्याने दोन स्पेसशिप लपवून ठेवल्याचा दावा फ्लोरिडाच्या रॉबर्ट स्पेंसर यांनी केला होता. हँगर १८ या इमारतीबद्दल याच नावाचा एक चित्रपट देखील आला होता.

अमेरिकेच्या वायूसेनेने मात्र अशी कोणती इमारतच अस्तित्वात नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, राईट-पॅटर्सन बेसवर १८ क्रमांकाची एक इमारत खरोखरच असल्याचं दिसून आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT