moto g22 expected to launch soon check price and specifications and all leaked details  
विज्ञान-तंत्र

कमी किमतीत दमदार फीचर्स, येतोय Moto G22 स्मार्टफोन; पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

कमी बजेटमध्ये चांगला कॅमेरा आणि बॅटरी असलेला स्मार्टफोन शोधत आहात, तर Moto G22 स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. लॉन्च होण्यापूर्वीच या फोनचे स्पेक्स आणि फीचर्स लीक झाले आहेत. वाचा सविस्तर..

दरम्यान Moto G22 स्मार्टफोन लवकरच लॉन्च होऊ शकतो, कारण स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स तसेच त्याची किंमत आणि इतर डिटेल्स ऑनलाइन लीक झाले आहेत. या लेटेस्ट लीकनुसार, Moto G22 मध्ये 90Hz रीफ्रेश रेट डिस्प्ले असेल आणि MediaTek Helio G37 चिपसेट सपोर्ट दिला असेल. नवीन मोटोरोला जी-सीरीज फोन तीन वेगवेगळ्या कलर्स ऑप्शन्समध्ये येईल आणि 50-मेगापिक्सेलच्या प्रयमरी कॅमेरासह यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल असा दावा केला जात आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

किंमतीपासून ते स्पेसिफिकेशन्स सर्व काही लीक

टिपस्टर Nils Ahrensmeier (@NilsAhrDE) ने ट्विटरवर Moto G22 बद्दल माहिती लीक केली आहे. ट्विटमध्ये मोटोरोला फोनचे रेंडरचा देखील समावेश केला आहे जे यापूर्वी ऑनलाइन लिक झाले होते.

भारतात Moto G22 ची अपेक्षित किंमत

Moto G22 च्या फक्त 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 200 EUR (अंदाजे रु. 17,000) असल्याचे सांगितले जात आहे. हे कॉस्मिक ब्लॅक, आइसबर्ग ब्लू आणि व्हाईट कलर पर्यायांमध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे.

Moto G22 चे फीचर्स (अपेक्षित)

टिपस्टरनुसार, Moto G22 Android 12 वर चालेल आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा IPS LCD (1600x720 pixels) डिस्प्ले फीचर्स यामध्ये दिले जातील, असे सांगितले जात आहे की, हा आगामी फोन MediaTek Helio G37 चिपसेटने सुसज्ज असेल. Moto G22 मध्ये 4GB RAM असण्याची अपेक्षा आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी, मोटोरोला जी-सीरीज स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आहे. याशिवाय, कॅमेरा सेटअपमध्ये 180-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड स्नॅपर आणि एक f/2.2 लेन्स आणि f/2.4 लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो किंवा डेप्थ सेन्सर दिले आहे. सेल्फीसाठी, Moto G22 मध्ये f/2 आहे. 45 लेन्ससह 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. असा दावा केला जात आहे की, Motorola आगामी फोनमध्ये 64GB इंटरनल स्टोरेज देईल. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. Moto G22 मध्ये 5000mAh बॅटरी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचे वजनही 185 ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

SCROLL FOR NEXT