Motorola Edge 60 Pro Smartphone Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Edge 60 Pro : एकच झलक, सबसे अलग! मोटोरोलाचा स्मार्टफोन ‘Edge 60 Pro’ विक्रीसाठी उपलब्ध, दमदार फीचर्स अन् आकर्षक ऑफर्स, किंमत फक्त...

Motorola Edge 60 Pro Smartphone Price Features : मोटोरोला एज 60 प्रो भारतात लाँच झाला असून आकर्षक ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध आहे. दमदार प्रोसेसर, दर्जेदार कॅमेरे आणि फास्ट चार्जिंगसह हा स्मार्टफोन ग्राहकांचे लक्ष वेधतोय.

Saisimran Ghashi

Edge 60 Pro Price Features : मोटोरोलाने आपल्या लोकप्रिय ‘Edge 60’ सीरिजमधील आणखी एका दमदार स्मार्टफोनची भर घालत 30 एप्रिल रोजी ‘Motorola Edge 60 Pro’ भारतात लाँच केला. अवघ्या काही दिवसांतच हा हाय-एंड स्मार्टफोन ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध झाला असून दमदार फीचर्ससोबत आकर्षक ऑफर्सही कंपनीकडून दिल्या जात आहेत. स्मार्टफोन Flipkart आणि Motorola च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

दोन प्रकारांत उपलब्ध, किंमत आणि रंग

Motorola Edge 60 Pro दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

  • 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे 29,999 रुपये,

  • तर 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये मिळेल.

ग्राहकांना हा स्मार्टफोन Pantone Dazzling Blue, Pantone Sparkling Grape आणि Pantone Shadow या आकर्षक रंगांमध्ये मिळेल.

जबरदस्त ऑफर्स

  • ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ६ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI ची सुविधा उपलब्ध.

  • Flipkart Axis बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास मिळेल 5% कॅशबॅक.

  • नो-कॉस्ट EMI फक्त 5667 रुपयांपासून सुरू.

  • Exchange ऑफर मध्ये ग्राहकांना 29,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.

स्पेसिफिकेशन्स जबरदस्त प्रोसेसर, स्क्रीन आणि कॅमेरे

Motorola Edge 60 Pro मध्ये MediaTek Dimensity 8350 Extreme चिपसेट असून, यासोबत LPDDR4X RAM आणि UFS 4.0 स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोन Android 15 आधारित Hello UI वर चालतो आणि त्याला तीन वर्षांचे Android अपडेट्स व चार वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस मिळणार आहेत.

  • स्क्रीन : 6.7 इंचांचा Quad curved pOLED डिस्प्ले, 1.5K रिझोल्यूशन (1220x2712 पिक्सेल), 120Hz रिफ्रेश रेट, 4500 निट्स ब्राइटनेस आणि Gorilla Glass 7i संरक्षण.

  • कॅमेरे -

    • 50MP Sony LYTIA 700C प्रायमरी कॅमेरा

    • 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स

    • 10MP टेलिफोटो कॅमेरा

    • 10MP फ्रंट सेल्फी कॅमेरा

टिकाऊपणा आणि बॅटरी

स्मार्टफोनला IP68 आणि IP69 प्रमाणपत्रे असून, तो MIL-STD-810H प्रमाणित म्हणजेच लष्करी स्तराचा टिकाऊपणा देतो. यामध्ये Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा आहे.

याला 6000mAh ची मोठी बॅटरी असून, ती 90W TurboPower फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

अडवांस प्रोसेसर, दर्जेदार डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरे आणि दमदार बॅटरी यामुळे Motorola Edge 60 Pro हा प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये बेस्ट पर्याय ठरत आहे. त्यासोबत मिळणाऱ्या ऑफर्समुळे हा स्मार्टफोन खरेदी करणे ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT