Moto E32s
Moto E32s Sakal
विज्ञान-तंत्र

स्वस्तात मस्त! दमदार स्मार्टफोन Moto E32s भारतात लाँच; किंमत फक्त 8999 रुपये

सकाळ डिजिटल टीम

मोटोरोला (Motorola) ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto E32s लाँच केला आहे. मोटोरोलाचा हा नवा स्मार्टफोन सध्याच्या Moto E32 ची सुधारित आवृत्ती आहे. या स्मार्टफोनमध्ये इतर वैशिष्ट्यांसह 90Hz डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. Moto E32s मध्ये octa-core MediaTek Helio G37 चिपसेट देखील आहे आणि तो Android 12 OS वर चालतो. यासोबतच कंपनीने दोन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. फोनमध्ये IP52-सर्टीफाईड वॉटर रिपेलंट डिझाइन देखील आहे. मोटोरोलाचा हा नवा स्मार्टफोन लो-एंड मॉडेल Redmi 10A आणि हाय-एंड मॉडेल Realme C31 आणि Redmi 10 बरोबर इतर अनेक मॉडेल्सशी स्पर्धा करेल. या स्मार्टफोनची काय वैशिष्ट्ये आहेत, हे जाणून घेऊया.

Moto E32s ची किंमत - भारतात Moto E32s ची किंमत 3GB+32GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 8,999 रुपयांपासून सुरू होईल. परंतु ही इंट्रोडक्टरी प्राईज किती दिवसांसाठी लागू असेल, हे मोटोरोलाने अद्याप उघड केले नाही. हा स्मार्टफोन 4GB + 64GB मॉडेलमध्ये देखील येतो, याची किंमत 9,999 रुपये आहे. Moto E32s मिस्टी सिल्व्हर आणि स्लेट ग्रे रंगांमध्ये येतो. हा स्मार्टफोन 6 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart, Jio Mart, Jio Mart Digital आणि Reliance Digital वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Moto E32s ची वैशिष्ट्ये

  • ड्युअल-सिम (नॅनो) Moto E32s Android 12 वर चालते आणि 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ (720x1,600 पिक्सेल) डिस्प्ले स्पोर्ट करतो. फोन MediaTek Helio G37 चिपसेटसह, 680MHz IMG PowerVR GE8320 GPU आणि 4GB पर्यंत LPDDR4X रॅमसह सुसज्ज आहे.

  • फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/2.2 लेन्ससह 16-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर, 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, फोन 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे.

  • मागील आणि पुढचे दोन्ही कॅमेरे पोर्ट्रेट, पॅनोरमा, प्रो आणि नाईट व्हिजन सारख्या वैशिष्ट्यांना सपोर्ट करतात. रेअर कॅमेरा LED फ्लॅशसह सुसज्ज आहे आणि 30fps फ्रेम दराने फुल-एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

  • Moto E32s 64GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. फोनमध्ये एक स्पेशल microSD कार्ड स्लॉट आहे, ज्यावरून स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

  • कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.0, GPS/ A-GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. बोर्डवरील सेन्सरमध्ये एक्सीलरोमीटर समाविष्ट आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

  • फोन 5000mAh बॅटरीसह येतो आणि 10W चार्जर दिला गेलाय. याशिवाय फोनचे डायमेंशन 163.95x74.94x8.94 मिमी आणि वजन 185 ग्रॅम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT