Motorola Moto G
Motorola Moto G esakal
विज्ञान-तंत्र

Motorola Moto G : स्मार्टफोनचा बाप परत आला ! मोटोरोलाने लॉंच केले दोन नवीन स्मार्टफोन

सकाळ डिजिटल टीम

Motorola Moto G : Motorola ने मिड-रेंज सेगमेंटमध्ये Moto G 5G (2023) आणि Moto G Stylus (2023) स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने वॉटर रिपेलंट डिझाइनसह मोटोरोलाचे दोन्ही मॉडेल लॉन्च केले आहेत. या दोन्ही फोनची किंमत आणि या हँडसेटमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊया.

Moto G 5G (2023) मध्ये मिळतील ही वैशिष्ट्ये

Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या या हँडसेटला 120 Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. या मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5G चिपसेट आहे जो 6.5 इंच स्क्रीनसह येतो. 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा 48 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह उपलब्ध असेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 15W फास्ट चार्जसह येणाऱ्या या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर दोन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देऊ शकतो.

Moto G Stylus (2023) चे फीचर डिटेल्स जाणून घ्या

MediaTek Helio G85 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 6.5-इंच स्क्रीन आहे. 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील मिळेल.

या फोनमध्ये 15 वॉटचे फास्ट चार्जिंग देखील उपलब्ध आहे आणि 5000 mAh बॅटरी सपोर्ट असेल. या डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर व्यतिरिक्त फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह डॉल्बी अॅटमॉस आणि दोन मायक्रोफोन देण्यात आले आहेत.

Moto G 5G (2023) च्या किमतीशी संबंधित तपशील

मोटोरोलाच्या या मोबाईलची किंमत $249.99 (सुमारे 20,500 रुपये) आहे. या किंमतीत, 4 GB रॅम प्रकार उपलब्ध असेल, हा हँडसेट हार्बर मिस्ट आणि इंक ब्लू कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Moto G Stylus (2023) च्या किंमतीबद्दल जाणून घ्या

मिडनाईट ब्लू आणि ग्लॅम पिंक कलर पर्यायांसह लॉन्च केलेल्या या नवीनतम Motorola स्मार्टफोनची किंमत $ 199.99 (सुमारे 16,200 रुपये) आहे, या किंमतीवर 64 GB व्हेरिएंट उपलब्ध असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT