MS Dhoni  sakal
विज्ञान-तंत्र

MS Dhoni ने खरेदी केली 'ही' डॅशिंग Electric Car; फुल चार्जमध्ये धावणार 700 किमी

महेंद्रसिंग धोनी इलेक्ट्रिक कारमुळे चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड आणि क्रिकेट स्टार्सच्या कार, बाईक, ड्रेस, घड्याळ इत्यादींबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांना खूप उत्सुकता असते. माजी क्रिकेटर आणि विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या बाईक प्रेमामुळे खूप चर्चेत आहे. आता अलीकडे तो एका इलेक्ट्रिक कारमुळे चर्चेत आला आहे. आता धोनीने नवीन Kia EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओवर खरेदी केली आहे.

Kia ने अलीकडेच भारतात इलेक्ट्रिक कार EV6 सादर केली आहे. कंपनीने कंप्लीट बिल्ट युनिट (CBU) द्वारे भारतात EV6 चे 200 युनिट आणले आहेत. आतापर्यंत EV6 चे सर्व युनिट्स विकले गेले आहेत. Kia च्या मते, भारतीय बाजारपेठेसाठी अधिक युनिट्स आणण्यासाठी कंपनी काम करत आहे.

Kia ने EV6 भारतीय बाजारपेठेत दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. पहिले मॉडेल फ्रंट-माउंटेड सिंगल मोटर आणि टू-व्हील-ड्राइव्ह (2WD) कॉन्फिगरेशनसह येते. त्याची किंमत 59.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे 229 PS ची कमाल पॉवर आणि 350 Nm चे पीक टॉर्क निर्माण करते.

Kia EV6 चे दुसरे मॉडेल ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) आहे. त्याच्या प्रत्येक एक्सलवर एक इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. त्याचे पॉवर आउटपुट 325 PS आणि 605 Nm चे पीक टॉर्क वाढवले ​​गेले आहे. या वेरिएंटची किंमत 64.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Kia EV6 मध्ये 77.4 kWh चा बॅटरी पॅक आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 708 किमी धावू शकते. हा इलेक्ट्रिक क्रॉसओवर 350 kW DC फास्ट चार्जरने देखील चार्ज केला जाऊ शकतो. Kia EV6 फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकतो.

धोनीच्या मालकीच्या इतर गाड्यांबद्दल बोलायचे तर, त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ जीएलई, लँड रोव्हर 3, ऑडी क्यू7, जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक सारख्या लोकप्रिय वाहनांचा समावेश आहे. धोनीकडे Yamaha RD350, Harley-Davidson Fatboy BSA Goldstar, Kawasaki Ninja ZX14R आणि Kawasaki Ninja H2, Confederate Hellcat X32 सारख्या बाइक्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुंबईत मुसळधार पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन कक्षास भेट

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Tejashwi Yadav : ''महाआघाडी 2029मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार'' ; तेजस्वी यादव यांनी केली घोषणा, मात्र...

Mumbai Rain Update: डोंबिवली रस्ते पाण्याखाली, खासदारांच्या घरातही पाणी शिरलं, पाहा परिस्थिती

Asia Cup 2025 India Squad: शुभमन गिलमुळे यशस्वी जैस्वालवर अन्याय? सूर्यकुमार यादवने सांगितलं का केलं त्याला उपकर्णधार

SCROLL FOR NEXT