M.Tech in Electric Vehicle sakal
विज्ञान-तंत्र

M.Tech in Electric Vehicle : इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानात पहिल्यांदाच एम. टेक.

अभियांत्रिकी शिक्षणात सोलापूरने ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्रात एम. टेक. (ईव्ही) हा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सुरू होत आहे. आगामी काळातील ई-व्हेईकल तंत्राचा विकास व वाढ लक्षात घेत ही शैक्षणीक संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अभियांत्रिकी शिक्षणात सोलापूरने ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्रात एम. टेक. (ईव्ही) हा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सुरू होत आहे. आगामी काळातील ई-व्हेईकल तंत्राचा विकास व वाढ लक्षात घेत ही शैक्षणीक संधी उपलब्ध करण्यात आली आहे. नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील कुशल व्यावसायिकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सातत्याने इलेक्ट्रीक वाहने बाजारात दाखल झाली आहेत. या शिवाय एसटीने देखील इलेक्ट्रिक बस बाजारात आणल्या आहेत. प्रिसिजन उद्योग समुहाने देखील या तंत्रज्ञानाच्या उत्पादनासाठी पाऊले उचलली आहेत. या कोर्समध्ये सहा विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असेल. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स संलग्नित अभियांत्रिकी पदवीधारकांना त्यासाठी प्रवेश घेता येतो.

ई-वाहन तंत्रज्ञानाचे महत्त्व

  • कार्बन उत्सर्जन कमी करणे

  • हवामानातील कार्बन उत्सर्जनाचे परिणाम कमी करणे

  • शाश्वत वाहतुकीकडे जागतिक बदलाची दिशा

  • पर्यावरणीय प्रभाव

  • ऊर्जा कार्यक्षमता

  • आर्थिक वाढ

  • तांत्रिक नवोपक्रम

  • ऊर्जा स्वातंत्र्य

अभ्यासक्रमाची रचना

विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील सर्वसमावेशक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्यांसह सुसज्ज करणे आहे. इलेक्ट्रिक पॉवरट्रेन डिझाइन, बॅटरी टेक्नॉलॉजी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, व्हेईकल डायनॅमिक्स आणि शाश्वत ऊर्जा उपाय यासारख्या आवश्यक बाबींचा अंतर्भाव करण्यासाठी हा अभ्यासक्रम बारकाईने तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हँड्स-ऑन प्रशिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योग सहकार्याचा फायदा होईल, हे सुनिश्चित करून ते विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल देखभाल व दुरुस्तीच्या क्षेत्रात सध्या मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. पण हे क्षेत्र सातत्याने विकसित होत आहे. याचा विचार करून हा अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे.

- प्रो. एस. एस. काळे, विभागप्रमुख, नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT