Mukesh Ambani 
विज्ञान-तंत्र

डिजिटलवाढीसाठी गरिबांना मोबाईल सबसिडी द्या - मुकेश अंबानी

डिजिटलवाढीसाठी गरिबांना मोबाईल सबसिडी द्या - मुकेश अंबानी

सकाळ वृत्तसेवा

रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी यांनी स्वस्त दरात मोबाईल खरेदी करण्यासाठी गरिबांना सबसिडी देण्याची मागणी केली आहे.

रिलायन्स जिओचे (Reliance Jio) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी स्वस्त दरात मोबाईल खरेदी करण्यासाठी गरिबांना सबसिडी देण्याची मागणी केली आहे. इंडिया मोबाईल कॉंग्रेस 2021 (India Mobile Congress 2021) मध्ये बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, सरकारी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाचा (Government Universal Service Obligation Fund) वापर देशात मोबाईल सबसिडी देण्यासाठी केला पाहिजे. मुकेश अंबानी यांचे मत आहे की, देशातील उपेक्षित लोकांना देशाच्या डिजिटल विकासाचा भाग बनवायचा असेल, तर त्यांना स्वस्त दरात सेवा आणि उपकरणे उपलब्ध करून दिली पाहिजेत.

मोबाईल इंडिया कॉंग्रेस

मोबाईल इंडिया कॉंग्रेस 2021 इव्हेंट आजपासून म्हणजेच 8 डिसेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मोबाईल इंडिया कॉंग्रेस 2021 मध्ये टेलिकॉम मंत्र्यांसह दूरसंचार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होत आहेत.

5G रोलआउट जिओचे पहिले प्राधान्य

मुकेश अंबानी म्हणाले की, देशात 5G आणणे ही जिओची पहिली प्राथमिकता आहे. 5G बद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, आम्ही शंभर टक्के नेटिव्ह आणि सर्वसमावेशक 5G सोल्यूशन विकसित केले आहे जे पूर्णपणे क्‍लाउड नेटिव्ह, डिजिटल व्यवस्थापित आणि भारतीय आहे. आमच्या तंत्रज्ञानामुळे, जिओ नेटवर्क लवकरात लवकर 4G वरून 5G वर अपग्रेड केले जाऊ शकते. अंबानी देशातील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रम, इंडिया मोबाइल कॉंग्रेस 2021 (IMC 2021) मध्ये बोलत होते.

डिजिटल वाढीसाठी परवडणारा स्मार्टफोन आवश्‍यक

मुकेश अंबानी म्हणाले की, भारताने लवकरात लवकर 2G वरून 4G आणि नंतर 5G कडे वळले पाहिजे. कोट्यवधी भारतीयांना सामाजिक- आर्थिक पिरॅमिडच्या तळाशी 2G पर्यंत मर्यादित ठेवल्यामुळे त्यांना डिजिटल क्रांतीच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जात आहे. कारण कोविडमध्ये आपण पाहिले की जेव्हा सर्व काही बंद होते, तेव्हा फक्त इंटरनेट आणि मोबाईल आपल्यासोबत होते. तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा आणि रोजगाराचा कणा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT