Semiconductor Plants eSakal
विज्ञान-तंत्र

Semiconductor Plants : भारतात उभारणार महाकाय सेमीकंडक्टर प्लांट्स; टाटा ग्रुप अन् इस्राइलच्या कंपनीने दिले अब्जावधींचे प्रस्ताव

Semiconductor Production : सरकारला सेमीकंडक्टर बनवण्यासाठी चार, तसेच चिप असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग युनिट्ससाठी (ATMP) 13 प्रस्ताव मिळाले आहेत.

Sudesh

Semiconductor Plants in India : भारतात लवकरच महाकाय सेमीकंडक्टर प्लांट्स उभारण्यात येणार आहेत. हे पूर्णपणे विकसित प्लांट्स असणार आहेत. याव्यतिरिक्त कित्येक चिप असेंब्ली आणि पॅकेजिंग युनिट्स देखील भारतात उभारण्यात येणार आहेत. यासाठी इस्राइलच्या टॉवर सेमीकंडक्टर्स (Tower Semiconductors) या कंपनीने आठ अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव सादर केला आहे. असाच एक प्रस्ताव टाटा ग्रुपने देखील सादर केल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी दिली.

सरकारला मिळाले 13 प्रस्ताव

चंद्रशेखर यांनी सांगितलं, की जगभरातील कित्येक कंपन्या भारतात सेमीकंडक्टर प्लांट्स (Semiconductor Plants) उभारण्यासाठी उत्सुक आहेत. सरकारला सेमीकंडक्टर बनवण्यासाठी चार, तसेच चिप असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग युनिट्ससाठी (ATMP) 13 प्रस्ताव मिळाले आहेत. याव्यतिरिक्त अमेरिकेतील मेमरी चिप बनवणारी कंपनी मायक्रॉन (Micron) ही गुजरातमध्ये आधीपासूनच 22,516 कोटींची गुंतवणूक करून चिप असेंब्ली युनिट उभारत आहे.

..तर निवडणुकांनंतर मंजूरी

या प्लांटमध्ये 65, 40 आणि 28 नॅनोमीटर टेक्नॉलॉजीचे सेमीकंडक्टर बनवण्यात येतील. सर्व कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावांवर विचार सुरू आहे. आम्ही निवडणुकांपूर्वी या प्लांट्सना मंजूरी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, तसं झालं नाही तर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात या प्रस्तावांना नक्कीच मंजूरी मिळेल, असं चंद्रशेखर यावेळी म्हणाले.

भारताला काय फायदा?

सध्या मोठमोठ्या कंपन्या आपली इलेक्ट्रॉनिक उत्पादने भारतात बनवत आहेत. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत कित्येक गोष्टी देशात तयार होत असताना सेमीकंडक्टरसाठी मात्र आपण इतरांवर अवलंबून आहोत. भारतात सेमीकंडक्टरची मागणी ही पुढील वर्षांपर्यंत 100 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अशात जर भारतातच सेमीकंडक्टरची निर्मिती सुरू झाली, तर होणारा खर्च कमी होईलच. मात्र दुसरीकडे सेमीकंडक्टरच्या निर्यातीत एक अग्रगण्य देश म्हणून भारत पुढे येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT