Cyber Fraud eSakal
विज्ञान-तंत्र

Cyber Fraud : आईच्या मोबाईलवर खेळायचा गेम, सायबर फ्रॉडमध्ये गमावले 2 लाख; घाबरुन तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

आई-वडील आपल्याला रागावतील या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.

Sudesh

Online Fraud : सध्या भारतात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर गुन्हेगार कधी नोकरीच्या आमिषाने तर कधी क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करतात. यामध्ये कित्येक जण लाखो रुपये गमावतात. असाच एक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. नालासोपारा येथील एका 18 वर्षीय तरुणाने ऑनलाईन फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केली.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारची आहे. अकरावीमध्ये शिकणारा वरुण (नाव बदललं आहे) आपल्या आईच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळायचा. यावेळी त्याला एक संशयास्पद लिंक असणारा मेसेज आला. या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही मिनिटांमध्येच आणखी एक मेसेज आला, ज्यामध्ये 2 लाख रुपये डेबिट झाल्याची माहिती होती. यानंतर त्याला समजलं की त्याची फसवणूक झाली आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तरुणाने घाबरुन आत्महत्या केली. आई-वडील आपल्याला रागावतील या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. या तरुणाच्या घरातून कोणत्याही प्रकारची 'सुसाईड नोट' मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

घाबरून संपवलं जीवन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर या तरुणाने घाबरून कीटकनाशक प्राशन केलं. यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीच्या लक्षणांनुसार मृत्यूचं कारण दारुचं अतिसेवन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र नंतर त्याने कीटकनाशक प्राशन केल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT