Nagpur news Instagram Reels video appearing in Whatsapp
Nagpur news Instagram Reels video appearing in Whatsapp 
विज्ञान-तंत्र

भन्नाटच! Whatsapp मध्ये दिसणार Instagram Reels व्हिडिओ; फीचर्सचे टेस्टिंग सुरू

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जगभरात व्हॉट्सॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावरून कंपनीकडूनही आपल्या युजर्ससाठी नवनवे फीचर्स आणले जात आहेत. त्यानंतर आता व्हॉट्सॲपमध्ये इंस्टाग्राम रील्सचे शॉर्ट व्हिडिओ लवकरच दिसणार आहेत. सध्या या फीचर्सचे टेस्टिंग सुरू असून, हे फीचर्स लवकरच सर्वांना मिळणार आहे. सध्या इंस्टाग्रामवरील रील्स व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामने रील्स व्हिडिओ सुरू केले. याला युजर्संचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता इंस्टाग्राम रील्सचे व्हिडिओ लवकरच व्हॉटसअपध्ये सुद्धा दिसणार आहेत.

येत्या काही दिवसांत व्हॉट्सॲवर एक खास टॅब दिसणार आहे. ज्यावर इंस्टाग्राम रील्सचे शॉर्ट व्हिडिओ दिसणार आहेत. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. फेसबुकने व्हॉट्सॲपमध्ये एक डेडिकेटेड इंस्टाग्राम रील्स टॅबची टेस्टिंग सुरू केली आहे. आगामी काही दिवसांत याला डेव्हलप केले जाऊ शकते. यावर्षी लोकांना व्हॉट्सॲपमध्ये हे खास फीचर मिळू शकतो.

आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेशन प्रोसेसरवर विशेष लक्ष दिले जात आहे. इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. याचा यूजरवर्गही मोठा आहे. या रील्स व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजक शॉर्ट व्हिडिओ दिले जातात. त्यामध्ये वेगळीच धम्माल पाहिला मिळते. आता हेच व्हिडिओ तुम्हाला लवकरच व्हॉट्सॲपवरही पाहता येणार आहे.

काही दिवसांत मिळेल सविस्तर माहिती

व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम फेसबुकची मालकी असलेली कंपनीने नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेशन प्रोसेसरवर जोर दिला आहे. कोणत्याही मोठ्या कंपनीच्या एक प्लॅटफॉर्मवर एक दुसऱ्याच्या चांगले फीचर्स दिसल्यानंतर लोकांना पॉप्यूलिरिटी वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. व्हॉट्सॲपमध्ये काही महिन्यांपासून अनेक फीचर्स जोडले आहेत. फेसबुकचा हा प्रयत्न राहिला आहे की, व्हॉट्सॲपमध्ये एक खास टॅब असायला हवे. ज्यावर युजर्संना इंस्टाग्राम रिल्स पाहता येऊ शकतील. यात रिल्स बनवण्याची सुविधा दिली जाऊ शकते. आगामी काही दिवसांत याची सविस्तर माहिती मिळू शकेल.

खूप काही नवीन येणार आहे

फेसबुक या प्रयत्नात आहे की इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपचे फीचर्सचे इंटिग्रेशन असायला हवे. युजर्संना व्हॉट्सॲपमध्ये इंस्टाग्राममध्ये हे खास फीचर्स मिळणार आहे. सध्या ही प्रक्रिया टेस्टिंग मध्ये आहे. यासंबंधी सध्या काही ठोस सांगता येत नाही. आगामी काही दिवसांनंतर याच्या फीचर्सची माहिती मिळू शकते. ज्यात मल्टी डिव्हाईस सपोर्ट, कम्प्यूटर आणि लॅपटॉप वर व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग सुविधा प्रमुख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT